'Gandhi Vs Godse' वादात; राजकुमार संतोषी विरोधात मुर्दाबादच्या घोषणा

या सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांचं असून,सिनेमात गांधी आणि गोडसे यांच्या जेलमधील भेटीवर प्रकाश टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
Anti-Rajkumar Santoshi slogans on the streets for not paying dues on film 'Gandhi Vs Godse'
Anti-Rajkumar Santoshi slogans on the streets for not paying dues on film 'Gandhi Vs Godse'Google
Updated on

'अंदाज अपना अपना','घायल','दामिनी' सारख्या सिनेमांचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी(Rajkumar Santoshi) यांच्यावर आपला नवीन सिनेमा 'गांधी वर्सेस गोडसे'(Gandhi V/s Godse) सिनेमासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं पेमेंट थकवल्याचा आरोप केला गेला आहे. काही फोटो समोर आले आहेत,ज्यामध्ये राजकुमार संतोषी विरोधात 'मुर्दाबाद' अशी घोषवाक्य लिहिलेली दिसत आहे. काही कर्मचारी हे पोस्टर हातात घेऊन दिसत आहेत.

Anti-Rajkumar Santoshi slogans on the streets for not paying dues on film 'Gandhi Vs Godse'
शहनाझ गिल नाराज; सलमानचा 'कभी ईद,कभी दिवाली' सिनेमा सोडण्याचा निर्णय?

एका इंग्रजी न्यूज वेबसाईटनं ही पोस्टर शेअर केली आहे,ज्यात म्हटलं आहे की''तीन वर्षांपेक्षा अधिक काळ होऊन गेला आहे . अद्याप सिनेमासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेमेंट मिळालेलं नाही. कंपनीकडे कजाकिस्तानला जाण्यासाठी पैसे आहेत,आर्ट डायरेक्टर,असिस्टंटला देण्यासाठी पैसे नाहीत. कार्पेंटरला द्यायला पैसे आहेत. पण आमच्या सारख्या सेटिंग बॉयला द्यायला पैसे नाहीत. प्रत्येक वेळी नवीन तारिख सांगतात. अशा प्रॉडक्शन डिझायनर्स आणि प्रॉडक्शन डायरेक्टरसोबत कोणी कामच करायला नको. ना कोणत्या कंपनीनं यांना काम द्यायला हवं. आपल्या फायद्यासाठी आमच्यासारख्या छोट्या कर्मचाऱ्यांचं छोटंसं मानधनही थकवतात''.

Anti-Rajkumar Santoshi slogans on the streets for not paying dues on film 'Gandhi Vs Godse'
कार्तिकच्या 'भूलभूलैय्या 2' ला लागलं ग्रहण; सोशल मीडियावर सिनेमाला विरोध

एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, आता हे प्रकरण FWICE कडे पोहोचलं आहे. संस्थेचे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी या घटनेविषयी स्पष्टिकरण देताना म्हटलं आहे की,''आम्ही राजकुमार संतोषी यांच्यासोबत मीटिगं केलेली आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन देण्याचं कबूल केलं आहे. आमच्या जवळ कर्मचाऱ्यांतर्फे तक्रार नोंदवली गेली होती''. दुबे पुढे म्हणाले आहेत,''शक्यता आहे की राजकुमार संतोषी विरोधात कट करणाऱ्यांनी देखील असे मुर्दाबादचे पोस्टर्स लावले असावेत. कदाचित त्यात कर्मचारी किती असतील हे सांगता येणार नाही. कारण स्वतः कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं आहे की राजकुमार संतोषी यांनी त्यांना थकीत मानधन देण्याचं कबूल केलं आहे''.

Anti-Rajkumar Santoshi slogans on the streets for not paying dues on film 'Gandhi Vs Godse'
शाहरुख-अजयला कुणी पाठवली 5-5 रुपयाची मनी ऑर्डर? कारणही ऐकाल तर व्हाल थक्क

'गांधी वर्सेस गोडसे' विषयी बोलायचं झालं तर हा सिनेमा बनून पूर्ण तयार आहे. १९४७/१९४८ नंतरच्या भारताची झलक या सिनेमात पहायला मिळते. सिनेमात गांधीजींच्या विचारांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या विषयावरुन आजही वाद होत आहेत. हा सिनेमा नथुराम गोडसे नाटकावर आधारित असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमात गांधी आणि गोडसे यांच्या जेलमधील भेटीवर प्रकाश टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या सिनेमात आसिफ जकारिया,अनुज सैनी आणि पवन चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.