Anupam Kher as Gurudev Ravindranath Tagore: अनुपम खेर हे भारतीय मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते. अनुपम खेर यांनी आजवर विविध भुमिकांमधुन केवळ बॉलीवूड नव्हे तर हॉलीवुडमध्येही अभिनय केलाय.
अनुपम खेर यांच्या अनेक भुमिका चाहत्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. अनुपम खेर यांनी सोशल मिडीयावर त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केलीय. गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांची भुमिका अनुपम खेर साकारणार आहेत.
(Anupam Kher Announces New Project, To Portray Rabindranath Tagore In His Next first look viral )
अनुपम खेर यांनी रविंद्रनाथ टागोरांचा एक लुक सोशल मिडीयावर शेअर केलाय. या लुकमध्ये अनुपम खेर हुबेहूब रविंद्रनाथ टागोर दिसत आहेत.
अनुपम खेर यांनी हा लुक शेअर करुन लिहीलंय की.. माझ्या ५३८व्या आगामी प्रोजेक्टमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका साकारताना आनंद झाला.
योग्य वेळी तपशील उघड करेन. गुरुदेवांना पडद्यावर साकारण्याचे सौभाग्य मिळाले हे माझे भाग्य आहे! या चित्रपटाची अधिक माहिती लवकरच तुमच्यासोबत शेअर करू!
रवींद्रनाथ टागोर हे 1913 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय होते. त्यांनी भारत आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत लिहिले आणि इतर अनेक गाणी तयार केली.
त्यांना गुरुदेव, कबिगुरु आणि बिस्वकाबी यासह अनेक नावांनी ओळखले जाते. याशिवाय त्यांना सामान्यतः 'बंगालचा बार्ड' म्हणून संबोधले जाते.
रविंद्रनाथ टागोरांचा जन्म 7 मे 1861 रोजी कोलकाता येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला आणि वयाच्या 8 व्या वर्षी त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी "भानुसिंह" हे टोपणनाव वापरून त्यांचा पहिला कवितासंग्रह तयार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.