मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files Movie) चित्रपटातून काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवला आहे. पण, या चित्रपटात खरा इतिहास दाखवला नाही, अशी टीका होत आहे. या चित्रपटावरून सध्या सोशल मीडियावर वाद रंगला असताना अनुपम खेर (Anupam Kher) यांचं जुनं ट्विट व्हायरल होतंय. आपण फक्त भारतीय म्हणून देशाची प्रगती करू शकतो, असं ते म्हणतात.
आपण केवळ भारतीय म्हणून प्रगती करू शकतो. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्माचे म्हणून आपण प्रगती करू शकत नाही, असं अनुपम खेर त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात. त्यांनी जवळपास ८ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१४ मध्ये हे ट्विट केलं होतं. काही नेटकऱ्यांनी त्यांचं ट्विट व्हायरल केलं असून त्यांच्यावर टीका केली जात आहे. या ट्विटवरून अनुपम खेर ट्रोल होत आहेत. (Anupam Kher Tweet)
नेमका काय आहे वाद? -
काश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहण्याचा आग्रह सोशल मीडियावरून केला जातोय. काहींनी या चित्रपटाचं कौतुक केलंय, तर काहींनी हा चित्रपट धार्मिक ध्रुवीकरण करतोय, अशी प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एका धर्माला खलनायकाच्या भूमिकेत दाखवणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. पण, भाजपकडून या चित्रपटाचं समर्थन केलं जात आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी (PM Modi) काश्मीर फाईल्स चित्रपटाचं कौतुक केलं असून असे चित्रपट बनवायला पाहिजे असं म्हटलं. त्यानंतर भाजप धार्मिक ध्रुवीकरण करतंय, असा आरोप काँग्रेसकडून (Congress) करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.