R Madhavan's Rocketry: सिनेमा पाहून खेर रडले, भारतीयांनी माफी मागा म्हणाले

आर.माधवनच्या 'रॉकेट्री- द नंबी इफेक्ट' सिनेमाची सर्वसामान्यांपासून बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत सारेच प्रशंसा करताना दिसत आहेत.
Anupam Kher reviews R Madhavan's Rocketry;and say,'Indian should watch it! And say sorry to..'
Anupam Kher reviews R Madhavan's Rocketry;and say,'Indian should watch it! And say sorry to..' Google
Updated on

आर.माधवनच्या(R.Madhavan) 'रॉकेट्री'(Rocketry) सिनेमाला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या सिनेमाच्या माध्यमातूम माधवनने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे. या सिनेमाचं कथानक आपले माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. आर.माधवननेच या सिनेमात नंबी नारायणन यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. ज्या पद्धतीनं माधवननं या सिनेमाच्या कथेचा ग्राफ ठेवला आहे,ज्या पद्धतीनं ती मांडली आहे ते पाहून सर्वसामान्यांपासून बॉलीवूडच्या बड्या सेलिब्रिटींपर्यंत सारेच सिनेमाची वाहवा करताना दिसत आहेत. या प्रशंसकांमध्ये बॉलीवूड स्टार अनुपम खेर(Anupam Kher) यांचे नाव देखील सामिल आहे. अनुपम खेर यांनी सिनेमाची भरपूर प्रशंसा तर केलीच पण सिनेमा पाहताना ते भावूकही झाले अन् त्यांच्या डोळ्यातून अश्रूही वाहिले.(Anupam Kher reviews R Madhavan's Rocketry;and say,'Indian should watch it! And say sorry to..')

Anupam Kher reviews R Madhavan's Rocketry;and say,'Indian should watch it! And say sorry to..'
'भारतीय पुरुषांनी मला नेहमीच...'; काय बोलून बसली मल्लिका शेरावत

काही दिवसांपूर्वीच अनुपम खेर यांनी 'रॉकेट्री' सिनेमा पाहिला. या सिनेमाला पाहिल्यानंतर ट्विटरवर अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी आर.माधवनची खूप प्रशंसा केली. त्यांनी ट्वीट करताना लिहिलं आहे,''अभिनेता माधवनने नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित रॉकेट्री सिनेमा बनवला आहे,जो मी नुकताच पाहिला. सिनेमाला पाहिल्यानंतर मी खूप रडलो,मन मोकळं केलं. वास्तवात हा सिनेमा खूपच असामान्य आणि प्रेरणादायी आहे. प्रत्येक भारतीयाने सिनेमा नक्की पाहिला पाहिजे आणि नंबी नारायणन यांची प्रत्येकाने माफी मागायला हवी. यामुळे आपण इतिहासात केलेल्या चुका सुधारू शकते. ब्रावो प्रिय मित्र माधवन''.

या सिनेमासाठी आर.माधवनने प्रत्येक गोष्टीत लक्ष घातलं आहे,त्याची जबाबदारी उचलली आहे. त्यानं या सिनेमाचं लेखन,निर्मिती आणि दिग्दर्शन अशा तिहेरी भूमिका पार पाडल्यात. इस्त्रोचे माजी वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित या सिनेमाचा प्रीमियर यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडला. त्यावेळी सिनेमा पाहणाऱ्यांनी उभं राहून टाळ्यांच्या गडगडाटात सिनेमाचं तोंडभरून कौतूक केलं होतं. सिनेमाला पुरस्कारानं गौरविण्यातही आलं होतं. या सिनेमात शाहरुख खानने देखील छोटीशी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे.

Anupam Kher reviews R Madhavan's Rocketry;and say,'Indian should watch it! And say sorry to..'
Hruta Durgule ला चाहत्याचं सरप्राईज,'अनन्या' लिहिलेली अनोखी अंगठी दिली भेट

मीडियाच्या वृत्तानुसार,माधवनने या सिनेमाशी शाहरुख जोडला गेल्यानंतर सांगितलं होतं की,जेव्हा शाहरुख त्याच्या 'जीरो' सिनेमाचं शूटिंग करत होता. त्या दरम्यान एका बर्थ डे पार्टी दरम्यान शाहरुख आणि आर.माधवन भेटले होते. तेव्हा शाहरुख ने माधवनला 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' प्रोजेक्ट सोबत जोडले जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचबरोबर त्यानं सिनेमाच्या चालू कामाकाजाविषयी इंट्रेस्ट घेऊन आर.माधवनला खूप प्रश्न विचारले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.