Makar Sankranti 2023: 'अनुपमा'च्या स्टार कास्टने या प्रकारे साजरी केली मकर संक्रांत, तर अदा खानने...

सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. टीव्ही स्टार्सनीही हा सण उत्साहात साजरा केला.
TV Celebs
TV CelebsSakal
Updated on

'उत्तरायण', 'खिचडी', 'पोंगल', 'माघी' या नावांनी ओळखल्या जाणार्‍या मकर संक्रांतीच्या सणाला भारतात खूप महत्त्व आहे. दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला हा सण देशाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या निमित्ताने चविष्ट जेवणासोबतच लोक पतंगही उडवतात. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. टीव्ही स्टार्सनीही हा सण उत्साहात साजरा केला.

TV Celebs
R. Madhavan घरी पोंगलचं जंगी सेलिब्रेशन, फोटो व्हायरल
Aishwarya Khare
Aishwarya KhareSakal

'भाग्य लक्ष्मी'मध्ये लक्ष्मीची भूमिका साकारणारी ऐश्वर्या खरे आज मकर संक्रांत साजरी करत आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा फोटो शेअर करून चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पिवळ्या हिरव्या रंगाच्या ब्लाउजसोबत पिवळ्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती. त्याचबरोबर अवनीत कौरनेही इन्स्टा स्टोरीवर चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मकर संक्रांतीनिमित्त अदा खानने पतंग उडवून ती साजरी केली. 'नागिन 6' फेम अदा खानने तिचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हातात पतंग घेऊन आकाशाकडे पाहत आहे. यादरम्यान, अभिनेत्री लाल रंगाच्या लुकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तिने अनारकली सूट घातला आहे. लाल बांगड्या आणि कानातले घालून अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे. कुरळे केस तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

'अनुपमा'च्या बरखाने सोशल मीडियावर मकर संक्रांतीचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, बरखा उर्फ ​​अश्लेषा रुपाली गांगुली, गौरव खन्ना यांच्यासह संपूर्ण अनुपमाच्या कलाकारांसोबत उत्सव साजरा करताना दिसत आहे. यावेळी गुलाबी कलरच्या आउटफिट्समध्ये सर्वजण खूपच सुंदर दिसत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.