Anurag Kashyap : 'पठाण म्हणजे हॉलीवूडच्या अ‍ॅक्शनपटाची स्वस्त कॉपी!' अनुराग कश्यपनं टोचले कान

लीवूडचा किंग खान शाहरुखच्या पठाणच्या विक्रमी कमाईनं चाहते खुश झाले आहेत. शेवटी चार वर्षांनी का होईना त्यांच्या लाडक्या शाहरुखनं त्यांना जिंकून घेतले आहे.
Anurag Kashyap
Anurag Kashyap esakal
Updated on

Anurag Kashayp Bollywood director comment on Pathaan movie : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या पठाणच्या विक्रमी कमाईनं चाहते खुश झाले आहेत. शेवटी चार वर्षांनी का होईना त्यांच्या लाडक्या शाहरुखनं त्यांना जिंकून घेतले आहे. बॉक्स ऑफिसवर पठाणनं गेल्या वर्षींच्या सर्वच चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. त्यामुळे पठाणवर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे.

पठाणच्या बाबत आणखी एक मोठी गोष्ट सांगायची झाल्यास या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चारशे कोटींची कमाई केली आहे. अवघ्या सहाव्या दिवशीच अशी कामगिरी करणाऱ्या पठाणानं यानिमित्तानं पुन्हा एक मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे चाहत्यांनी किंग खानला शुभेच्छा दिल्या आहेत. ज्या पठाणवरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे त्यावरुन वेगवेगळया बॉलीवूड सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Also Read - T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपनं आता पठाणवर दिलेली प्रतिक्रिया शाहरुखच्या चाहत्यांना चांगलीच झोंबली आहे. अनुरागनं बॉलीवूडचे चित्रपट आणि हॉलीवूडची संकल्पना याचा संबंध जोडत दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. अनुराग म्हणतो की, हिंदी चित्रपट हे हॉलीवूडच्या चित्रपटाची स्वस्तात मस्त कॉपी आहे. त्यामुळे त्यांचे निर्मिती मुल्य काय आहे हे आपल्याला माहिती आहे.

एक काळ असा होता की, विदेशामध्ये बॉलीवूडच्या चित्रपटांचा वेगळाच प्रभाव होता. आता तो काही पाहायला मिळत नाही. बऱ्याचकाळापासून बॉलीवूडचे चित्रपट हे जगभर गाजताना दिसत आहेत. मात्र आता आपण ओरिजनल चित्रपट बनविण्याचे कष्ट घेत नाही ही खरी मोठी समस्या आहे. आपला मेन स्ट्रीम सिनेमा हा हॉलीवूडच्या अॅक्शन चित्रपटांची स्वस्तात मस्त कॉपी काढण्यात व्यस्त आहे. असेही कश्यप यांनी म्हटले आहे.

Anurag Kashyap
Pathaan Review : 'डोक्याची गोळी घेऊन जा! 'पठाण' पाहिल्यावर घ्यावीच लागेल'

साऊथचे चित्रपट अजुनही भारतीय चित्रपट वाटतात. त्यांचा चेहरा भारतीय आहे. याऊलट बॉलीवूड तसे नाही. ते नेहमीच परदेशी चित्रपटांची कॉपी करतात. बरेचसे हिंदी चित्रपट हे भारतीय चित्रपट वाटतच नाही. त्यामुळेच की काय आरआरआरनं आपल्या सर्वांना धक्का दिला. आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Anurag Kashyap
Pathaan: ‘पठाण’चे शो बंद पाडण्यासाठी बजरंग दलाचा राडा! भाईंदरमध्ये सिनेमागृहात तोफफोड..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.