Anurag Kashyap : 'आता माझा कोणत्याच सेन्सॉरशिपवर विश्वासच राहिला नाही'! अनुरागचा घणाघात

आपल्याला जे वाटतं ते रोखठोकपणे मांडत भलेही ते कुणाला न पटल्यास त्याविरोधात उभे राहण्याची ताकद असणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये अनुरागचे नाव घेतले जाते.
Anurag Kashyap Comment on The Kashmir Files The Kerala Story :
Anurag Kashyap Comment on The Kashmir Files The Kerala Story : esakal
Updated on

Anurag Kashyap Comment on The Kashmir Files The Kerala Story : आपल्याला जे वाटतं ते रोखठोकपणे मांडत भलेही ते कुणाला न पटल्यास त्याविरोधात उभे राहण्याची ताकद असणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये अनुरागचे नाव घेतले जाते. सेन्सॉर बोर्डाच्या नेहमीच विरोधात राहणाऱ्या अनुरागच्या कलाकृतींना चाहत्यांचा, प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनुराग हा वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्यं करुन चर्चेत आला आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या द कश्मिर फाईल्स अन् केरळ स्टोरीबद्दल त्यानं तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. त्यांना विशिष्ट विचारसरणीचे चित्रपट आणि त्यांच्या धोरणांबाबत त्यानं आक्षेप घेतला होता. त्यामुळे त्याच्यावर टीकाही झाली होती. मात्र आता त्याच चित्रपटांविषयी त्यानं दुसऱ्यांदा दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे.

गुलाल, देव डी, गँग्स ऑफ वासेपूर, सारख्या चित्रपटांतून आपण काय आहोत हे अनुरागनं दाखवून दिले आहे. बॉलीवूडमधील वेगळ्या धाटणीचा दिग्दर्शक म्हणून त्यानं अमाप लोकप्रियताही मिळवली आहे. यापूर्वी काही मुलाखतींमधून त्यानं आपल्याला ब्लॉकबस्टर टाईप चित्रपटांचा काही फॉर्म्युला सापडला नसून त्यामुळे वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये अधिक रस असल्याचे म्हटले होते.

आता पुन्हा एकदा एका मुलाखतीतून अनुरागनं सेन्सॉरशिप आणि चित्रपट यावर प्रतिक्रिया दिली आहे. काश्मिर फाईल्स आणि केरळ स्टोरी जेव्हा प्रदर्शित झाले तेव्हा त्यावर प्रोपगंडा करणारे चित्रपट असा त्यावर शिक्का मारण्यात आला होता. त्यावर अनुरागनं प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो मी आता सेन्सॉर बोर्डावर विश्वास ठेवणे बंद केले आहे. किंबहूना त्यांच्यावर माझा विश्वास नाहीच.

कुणाला कोणत्याही सीन आणि संवादामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. मला ते आवडेल पण त्यांना ते खटकू शकते. आणि माझ्याबाबत ते बऱ्याचदा दिसून आले आहे. पण मला वाटते कश्मिर फाईल्स असो किंवा केरळ स्टोरीज या सारख्या चित्रपटांवर देखील चर्चा व्हायला हवी. त्यातून अनेक गोष्टी समोर येतील.

ओटीटी प्ले ला दिलेल्या त्या मुलाखतीमध्ये अनुराग म्हणतो की, तुम्हाला वाटतं कश्मिर फाईल्स किंवा केरळ स्टोरी यशस्वी झाले. त्यांना बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसादही मिळाला. याची कारणं वेगळी असू शकतात. आपण आपल्या चित्रपटांतून किती प्रमाणात जागरुकता आणि समाजप्रबोधन करण्याचा विचार करतो हे जास्त महत्वाचे आहे.

Anurag Kashyap Comment on The Kashmir Files The Kerala Story :
Animal Ranbir Kapoor : रणबीरच्या 'अ‍ॅनिमल' मुळे शीख बांधव नाराज, काय आहे कारण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.