Bollywood Vs Tollywood; तिकीटाला पैसे नाहीत, चित्रपट चालतील कसे? अनुराग कश्यपचा भडका

बॉलीवूडचा स्टार दिग्दर्शक अनुराग कश्यप हा त्याच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक आहे.
  anurag kashyap on bollywood films
anurag kashyap on bollywood filmsesakal
Updated on

Bolltywood Anurag Kashyap: बॉलीवूडचा स्टार दिग्दर्शक अनुराग कश्यप हा त्याच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक आहे. तो आता निर्मिती प्रक्रियेत देखील आला आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता आणखी (Social media viral news) वाढली आहे. अनुरागनं नेहमीच त्याच्या चाहत्यांना आगळ्या वेगळ्या चित्रपटांची मेजवानी दिली आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. सध्या अनुरागच्या दोबारा चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. त्यात अभिनेत्री तापसी पन्नुनं महत्वाची भूमिका साकारली आहे. (Bollywood vs tollywood) अनुरागनं बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड या वादावर पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूड पटांचे अपयश हे अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. अल्लु अर्जुनच्या पुष्पापासून टॉलीवूडच्या चित्रपटांचा जो जोरदार प्रवास सुरु झाला तो कमल हासन यांच्या विक्रमपर्यत तसाच राहिला. त्यामुळे बॉलीवूडच्या दिग्गजांचे चित्रपट फ्लॉप झाल्याचे दिसून आले होते. वादाच्या भोवऱ्यात एखादी कलाकृती अडकवून त्याच्यावरुन वाद तयार करुन प्रसिद्धी मिळवण्याचा सोस काही नवीन नाही. त्यामुळे बॉलीवूडच्या चित्रपटांना मोठा वर्ग मिळाला आहे. यासगळ्यात प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपनं प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद सोशल मीडियावर रंगला आहे. त्यावरुन आतापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी आपआपली मतं नोंदवली आहेत. अनुरागनं प्रतिक्रिया दिली आहे तो म्हणतो, आपण बॉलीवूड फ्लॉप होतो आहे असे म्हणतो, पण नेमकं काय होतंय हे लक्षात घ्यायला तयार नाही. कोरोनाच्या काळात अनेक गोष्टींमध्ये मोठा बदल झाला आहे. मनोरंजन विश्वावर देखील त्याचे मोठे पडसाद उमटले आहेत. बॉलीवूड फ्लॉप होण्यामागे आपण काही कारणं जाणून घेतली पाहिजेत. जसं की जो व्यक्ती चित्रपट पाहण्यासाठी जातो त्याच्या आर्थिक क्षमतेवर गेल्या दोन वर्षात काय परिणाम झाले हे अभ्यासण्याची गरज आहे.

  anurag kashyap on bollywood films
Laal Singh Chaddha आणि मिलिंद सोमणचा न्यूड फोटो, समोर आलं मोठं कनेक्शन,वाचा

मध्यमवर्गीय माणूस जो नियमितपणे चित्रपट पाहतो असे आपण म्हणतो त्याच्याकडे खर्च करण्यासाठी पैसेच राहिलेले नाहीत. त्यामुळे झालं असं की, कोरोनानंतर अनेक गोष्टींमध्ये महागाई वाढली त्यात थिएटरमध्ये चित्रपट पाहणे अशक्य झाले आहे. बॉयकॉट बॉलीवूड सारखा ट्रेंड चालवला जातो यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्यासमोर इतर जे प्रश्न आहेत त्यापासून लक्ष हटवण्याचा प्रयत्न यानिमित्तानं केला जातो आहे..

  anurag kashyap on bollywood films
Anurag Kahsyap: देशात सध्या भीतीचं वातावरण! अनुराग का म्हणाला असं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.