Anushka Sharma: तो टॅक्स अनुष्कानेच भरायला हवा.. विक्री कर विभागाची हाय कोर्टाकडे मागणी..

थकबाकी वसूल करण्यासाठी सेल्स टॅक्स विभागाने अनुष्काला नोटीस बाजवली आहे.
Anushka Sharma is ‘the first owner of copyrights’ and is liable to pay tax, sales tax department tells Bombay High court
Anushka Sharma is ‘the first owner of copyrights’ and is liable to pay tax, sales tax department tells Bombay High courtsakal
Updated on

Anushka Sharma: आपल्या अभिनयाने आणि सोशल मीडियावरील पोस्ट मुळे चर्चेत असणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा आता वेगळ्याच प्रकरणाने चर्चेत आली आहे. अनुष्का सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे.

अनुष्का तिच्या प्रत्येक कंटेन्टच्या कॉपीराईटची स्वतः मालकीण आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक परफॉर्मन्सवर तिला त्याचा स्वतंत्र मोबदला मिळतो. मग तिच्या एखाद्या डान्सची साधी झलक जरी एखाद्या जाहिरातीत वापरली गेली तरी तिला त्याबदल्यात पैसे द्यावे लागतात.

जसे ती पैसे आकारते तसे या प्रत्येक मिळकतीवर तिनं कर भरणं ही अनिवार्य आहे. त्यामुळे सेल्स टॅक्स विभागाने तिला कर भरण्या संदर्भात नोटिस पाठवली होती. त्यावर अनुष्काने सेल्स टॅक्स विभागाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु ती याचिका फेटाळून लावण्याची मागणी सेल्स टॅक्स विभागाने हाय कोर्टाकडे केली आहे.

(Anushka Sharma is ‘the first owner of copyrights’ and is liable to pay tax, sales tax department tells Bombay High court)

Anushka Sharma is ‘the first owner of copyrights’ and is liable to pay tax, sales tax department tells Bombay High court
Girish Oak: एकीचं नाव घेतलं तर दुसरी नाराज होणार.. अभिनेते गिरीश ओक यांची पोस्ट चर्चेत..

अनुष्काने एका पुरस्कार सोहळ्यात केलेलं सादरीकरण आणि निवेदन यामुळे व्यावसायिकरित्या तिच्या प्रोडक्टची जाहिरात झाली होती, असा दावा कर सेल्स टॅक्स विभागाने साल 2012-13 साठी 12.3 कोटींच्या उत्पनावर 1.2 कोटी तर साल 2013-14 साठी 17 कोटींच्या उत्पनावर 1.6 कोटी रुपये कर आकारला. तो अनुष्काने भरला नसल्याने ही थकबाकी वसूल करण्याची नोटीस विक्री कर उपायुक्तांनी पाठवली.

या नोटीसीला अनुष्काने आव्हान देत हायकोर्टात धाव घेतली. याप्रकरणी अनुष्कापुढे अपिलीय लवादापुढे दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचा दावा केला. मात्र राज्य सरकारने याला विरोध केला होता. मात्र जर आम्ही ते अपील केलं तर आम्हाला त्यापूर्वी करातील 10 टक्के रक्कम जमा करावी लागेल असा दावा अनुष्काच्या वतीनं करण्यात आला आहे. 

दोन्ही वर्षांसाठी आलेल्या दोन स्वतंत्र नोटीसांना अनुष्कानं दोन स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिलं आहे. यातील एका याचिकेवर बुधवारी (29 मार्च) न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. तर दुस-या याचिकेवर आज (गुरूवार) हायकोर्टात सकाळच्या सत्रात सुनावणी होणार आहे. यासंदर्भात बुधवारी 29 मार्च झालेल्या सुनावणीत माजगाव विभागीय आयुक्तांनी आपलं प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे.

यापूर्वीही या मुद्यावर आपल्या कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली होती. मात्र अनुष्का यावर स्वतः याचिका का दाखल करत नाही?, एखाद्या व्यक्तीनं कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली असं आतापर्यंत कधीही घडलेलं नाही. असा प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयानं यावर आक्षेप घेतला होता त्यानंतर ती याचिका मागे घेऊन पुन्हा नव्यानं याचिका दाखल करण्याची मुभा देत ती याचिका निकाली काढली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.