apurva nemlekar: ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत होते तो क्षण आता अगदी जवळ आला आहे. गेली 98 दिवस आपण बिग बॉस मराठीचा खेळ पाहत आहोत. अवघ्या दोन दिवस या खेळाचा विजेता आपल्या समोर येणार आहे. त्या क्षणाची उत्सुकता आता चांगलीच वाढली आहे. अत्यंत दिमाखदार सोहळ्यात ही ट्रॉफी विजेत्याला दिली जाणार आहे. रविवारी हा सोहळा होणार असून यामध्ये आपल्या आवडत्या कलाकाराला विजयी करण्यासाठी चाहत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे.
(apurva nemlekar fans promoting hording and banner form supporting her and said please vote Bigg Boss Marathi 4)
बिग बॉस मराठी ४ चं पर्व आता संपत आलं आहे. येत्या रविवारी ८ जानेवारी रोजी बिग बॉसचा फिनाले आहे. या सोहळ्याला आता अवघे दोन दिवस राहिले आहेत. सोळा स्पर्धकांसोबत सुरु झालेला हा प्रवास टॉप पाच स्पर्धकांवर आला आहे. त्यामुळे या पर्वात कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये अपूर्वा नेमळेकर ही एक तगडी स्पर्धक मानली जाते. त्यामुळे तिला जिंकवण्यासाठी मुंबईकरांनी जोरदार तयारी केली आहे.
अपूर्वासाठी तिचे चाहते अक्षरशः रस्त्यावर उतरले आहेत. कुठे बॅनर तर कुठे पोस्टर घेऊन तिचे चाहते मुंबईच्या नाक्या नाक्यांवर उभे आहेत. भरगोस मतदान करून अपूर्वाला विजयी करा अशी विनंती तिच्या चाहत्यांनी केली आहे. याचे फोटो आता सोशल मिडियावर झळकत आहे.
हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर
९५ दिवसांचा टप्पा पार करून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर बिग बॉसच्या मराठीच्या शेवटच्या आठवड्यात पोहोचली. बिग बॉसच्या घरात तिकीट टू फिनाले मिळवून ती थेट टॉप फाइव्ह मध्ये गेली. या खेळासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. जेजे आडवे आले त्या प्रत्येकाशी ती एकहाती भिडली. तिने केवळ राडाच घातला नाही तर मेघा, स्नेहलता यांच्याशी प्रेमाचे संबंधही जोपासले. अक्षयवर भावासारखं प्रेम केलं तर विकास आणि तिच्या मैत्रिणे प्रेक्षकांना वेड लावलं. अशी हर हुन्नरी अपूर्वा आता ट्रॉफी पासून फक्त एक पाऊल दूर आहे. त्यामुळे तिला जिंकवण्यासाठी चाहते जोरदार प्रयत्न करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.