Arati Ankalikar Tikekar : 'शास्त्रीय संगीत सीमेपलीकडचे, आता जे ऐकतो ना ते...'आमच्या काळी' च्या पॉडकास्टमध्ये आरतीताई बिनधास्त बोलल्या!

आरती अंकलीकर-टिकेकर (Arati Ankalikar Tikekar Interview ) यांनी त्या मुलाखतीतून सध्याच्या नवोदित गायकांविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
Arati Ankalikar-Tikekar news
Arati Ankalikar-Tikekar news
Updated on

Arati Ankalikar-Tikekar Latest News : काय आहे शास्त्रीय संगीत, त्यातील विचार काय सांगतो, शास्त्रीय संगीतला फार मोठा श्रोतृवर्ग नको असतो तिथं मोजकाच श्रोता असला तरी पुरे, पण... या सारख्या शास्त्रीय संगीतातील वेगवेगळ्या गोष्टींवर प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांनी सकाळच्या आमच्या काळी नावाच्या खास पॉडकास्टमध्ये मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.

आरती अंकलीकर टिकेकर यांची ही मुलाखत घेतली आहे ती प्रसिद्ध मराठी अभिनेते अजय पुरकर यांनी. ही संपूर्ण मुलाखत ऐकण्यासाठी, बघण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा, आणि आरती ताईंनी शास्त्रीय संगीताविषयी नव्यानं काय विचार मांडले आहेत हे जाणून घ्या.

याशिवाय तुम्हाला या मुलाखतीमध्ये आरती ताईंच्या जीवन प्रवासाविषयी त्यांचा सांगीतिक प्रवास, अभिनेते उदय टिकेकर यांच्यासोबतच्या कॉलेजमधील आठवणी, गुरु ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांच्याकडे शिकतानाचे अनुभव हे सारं ऐकता येणार आहे.

Arati Ankalikar-Tikekar news
Laapataa Ladies Marathi Review: पत्नी हरवल्याचे दुःख आणि मग... विनोदाबरोबरच सामाजिक संदेश देणारा लापता लेडीज

तीन दशकांहून अधिक काळ आपल्या सुरेल सुरावटींनी श्रोत्यांना निखळ आनंद देणाऱ्या आरती अंकलीकर टिकेकर यांचा शास्त्रीय संगीताचा प्रवास हा खूपच प्रेरणादायी आहे. यावेळी त्यांनी सध्याच्या संगीतविश्वाविषयी व्यक्त केलेले विचार तर नवोदित संगीतकार, गायकांसाठी खूपच महत्वाचे आहेत. प्रेक्षकांचीही जबाबदारी आता बदलतेय. या साऱ्या गोष्टींविषयी त्या भरभरुन बोलल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.