Khatron Ke Khiladi 13: खतरो के खिलाडीच्या १३ व्या सीझनमध्ये सहभागी झालेल्या अर्चना गौतमविषयी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्घ अभिनेत्री अर्चना गौतम ही तिच्या बिनधास्तपणबद्दल ओळखली जाते. बिग बॉसमध्ये देखील तिनं तिच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली होती. Khatron Ke Khiladi 13 Contestant Archana Gautam Injured
आता अर्चनाला खतरो के खिलाडी मालिकेच्या चित्रिकरणाच्या दरम्यान मोठी दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. ती सध्या या मालिकेच्या चित्रिकरणासाठी आफ्रीकेतील केपटाऊन येथे गेली आहे. तिथं काही भागाचे शुटींग सुरु असून दरम्यान तिला अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी अर्चनाच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याची सुत्रांची माहिती आहे. तिला रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे.
Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा
अर्चनाला दुखापत झाल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अर्चना ही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. याशिवाय बिग बॉसमध्ये तिनं तिच्या आक्रमकपणामुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सोशल मीडियावर अर्चनाला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता ती खतरो के खिलाडीमधून अनेकांची पसंती मिळवताना दिसत आहे. तिला दुखापत झाल्याची बातमी कळताच अर्चनाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे,
अर्चनाला काहीही झालं तरी खतरो के खिलाडीची ट्रॉफी जिंकायची आहे. असं तिनेच एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. यानंतर अर्चनानं प्रचंड मेहनत घ्यायला सुरुवात केली आहे. एका टास्कच्या दरम्यान अर्चनाच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचे दिसून आले. तिच्या चेहऱ्याला काही टाकेही घालण्यात आले आहे. तिच्या चाहत्यांनी अर्चनाला आता आराम करण्याचा सल्ला दिला. काहींनी तिला काळजी घेत शुटींग पासून ब्रेक घ्यावा असेही सुचवले आहे.
अर्चनानं तिच्या इंस्टा अकाउंटवरुन शेयर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करुन चिंता व्यक्त केली आहे. अर्चना तू लवकरच या संकटातून बाहेर येशील. असे तिच्या चाहत्यांनी म्हटले आहे. त्यांनी अर्चनाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यासगळ्यात अर्चनानं हॉस्पिटलमधून एक व्हिडिओ देखील शेयर केला आहे. त्यात तिनं तिच्या प्रकृतीविषयी अपडेट दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.