सावत्र आई म्हणून श्रीदेवी घरात आली आणि अर्जुनची प्रकृती ढासळली..

बोनी कपूर यांनी अर्जुनच्या आईला म्हणजे मोना कपूरला घटस्फोट देऊन श्रीदेवीशी लग्नगाठ बांधली होती.
Arjun Kapoor Remembers His Mother Mona Shourie and boney kapoor divorce and step mother sridevi
Arjun Kapoor Remembers His Mother Mona Shourie and boney kapoor divorce and step mother sridevi sakal
Updated on

arjun kapoor birthday : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हा अभिनयासोबतच त्याचे कुटुंब आणि रिलेशनशिपमुळे नेहमी चर्चेत असतो. अर्जुनची कौटुंबिक पार्श्वभूमी फारच वेगळी आहे. त्यांत खूप लहान वयातच अनेक कटू अनुभव घेतले आहेत. त्यातलाच एक अनुभव म्हणजे अर्जुन च्या आई वडिलांचा घटस्फोट. अर्जुन हा हा बोनी कपूर (Boney Kapoor) आणि मोना शौरी कपूर (Mona Shourie Kapoor) यांचा मुलागा आहे. बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि मोना कपूर यांना घटस्फोट दिला. या धक्क्याने अर्जुन पूर्णतः खचला होता. आज अर्जुनकचा वाढदिवस त्यानिमित्ताचे त्याच्या आयुष्यातील ही महत्वाची आठवण. (Arjun Kapoor Remembers His Mother Mona Shourie and boney kapoor divorce and stepmother sridevi) (arjun kapoor relationship)

७० च्या दशकात श्रीदेवीला पहिल्यांदाच पदड्यावर बघून बोनी कपूर श्रीदेवीच्या प्रेमात पडले. श्रीदेवीला त्यांनी तमिळ चित्रपटात पहिले होते. पुढे त्यांनी श्रीदेवीला आपल्या चित्रपटात घेण्याचा चंग बांधला आणि 'मिस्टर इंडिया'मध्ये श्रीदेवी प्रमुख अभिनेत्री म्हणून झळकली. पुढे ते इतके तिच्या प्रेमात वेडे झाले की त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण बोनी कपूर आधीच लग्नाच्या बेडीत अडकले असल्याने त्यांना हा निर्णय काहीसा अवघड गेला. पण मोना कपूर यांना घटस्फोट घेऊन अखेर २ जून १९९६ रोजी श्रीदेवी बोनी कपूर यांच्या पत्नी झाल्या. पण ही बाब इतकी सोपी नव्हती.

Arjun Kapoor Remembers His Mother Mona Shourie and boney kapoor divorce and step mother sridevi
१२ वर्ष मोठी, पदरी मुल तरीही अर्जुन कपूरचा मलायकासाठी का तुटतो जीव, वाचाच

मोना आणि बोनी म्हणजेच आई वडिलांचा घटस्फोट अर्जुनला सहज झाला नाही. अर्जुन आणि मोना बोनी यांच्यापासून विभक्त झाल्या. याचा अत्यंत गंभीर परिणाम अर्जुनच्या प्रकृतीवर झाला. तेव्हा अर्जुन अवघ्या १६ वर्षांचा होता. त्याला मानसिक ताण इतका झाला ही त्याचे खाणे गरजेपेक्षा जास्त होऊ लागले. पुढे त्याचे वजन वाढत गेले. वयाच्या 16व्या वर्षी अर्जुनचे वजन 150 किलोच्या पुढे गेले होते. त्यामुळे त्याला दमा देखील झाला होता आणि तो जास्त काळ धावू शकत नव्हता. अशी त्याची स्थिती झाली होती.

वडिलांनी दुसरं लग्न केल्यानंतर झालेल्या त्रासाविषयी अर्जुननी एका मुलाखतीत सांगितलं होतं. तो म्हणाला होता, 'आई वडिलांचा घटस्फोट आणि दुसरं लग्न याचा मला खूप मनस्ताप झाला होता. विभक्त कुटुंबात राहणे खूप कठीण होते. पुढे माझ्या वडिलांनी श्रीदेवीशी लग्न करायचे ठरवले. तेव्हा त्या खूप मोठ्या स्टार होत्या. त्यामुळे मी शाळेत असताना माझे मित्र मला विचारायचे की, 'तुझी नवी आई (श्रीदेवी) कशी आहे?' असे विचारून ते मला चिडवायचे. तेव्हा मला खूप वाईट वाटत होते. तो काळ मी कसा पचवला आहे ही मी शब्दात सांगू शकत नाही.' असे तो म्हणाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.