Arjun Tendulkar : शाहरूखचं KKR विरोधात पदार्पण करणाऱ्या अर्जुनसाठी खास ट्वीट; म्हणाला, जेव्हा मित्राचा…

Arjun Tendulkar Debut  shah rukh khan congratulated  sachin tendulkar son arjun IPL 2023 debut
Arjun Tendulkar Debut shah rukh khan congratulated sachin tendulkar son arjun IPL 2023 debut
Updated on

SRK On Arjun Tendulkar Debut : शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो आयपीएलमधील त्याचा संघ कोलकाता नाइट रायडर्स म्हणजेच 'केकेआर'मुळे चर्चेत आहे. काल झालेल्या मुंबई इंडीयन्स आणि केकेआर यांच्यातील सामन्यादरम्यान माजी दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने 'केकेआर' विरुद्ध पदार्पण केलं, ज्यावर किंग खानने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांची मने जिंकली आहेत.

शाहरुखने अर्जुन तेंडुलकरचं केंलं अभिनंदन

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या आयपीएल पदार्पणावर शाहरुख खानने आनंद व्यक्त केला आहे. यासोबतच त्याने ट्विट करून त्यांचे अभिनंदन केलं. शाहरुखने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'हे आयपीएल स्पर्धात्मक असू शकते... पण जेव्हा तुम्ही मित्राचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मैदानात पाहता तेव्हा खूप आनंद होतो. अर्जुनला शुभेच्छा आणि सचिन तेंडुलकरसाठी किती अभिमानाचा क्षण!! खुप छान!

Arjun Tendulkar Debut  shah rukh khan congratulated  sachin tendulkar son arjun IPL 2023 debut
Kharghar Death : कार्यक्रम संध्याकाळी का घेतला नाही? उदय सामंत म्हणतात, मुख्यमंत्री म्हणाले…

हेही वाचा - What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

'पठाण'चं अभूतपूर्व यश

शाहरुख खान हा बॉलिवूड इंडस्ट्रीचा बादशाह मानलं जातं. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'पठाण' या चित्रपटाला जगभरातून प्रचंड प्रेम मिळाले. या चित्रपटाने वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर 1050 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि भारतात 525 कोटी रुपयांची कमाई केली. शाहरुख खान हा आयपीएल क्रिकेट संघ कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आहे.

Arjun Tendulkar Debut  shah rukh khan congratulated  sachin tendulkar son arjun IPL 2023 debut
Maharashtra News : सूर्य ओकतोय आग! उष्माघातापासून वाचण्यासाठी काळजी घ्या; राज्यात 'येथे' सर्वाधिक तापमान

अर्जुन तेंडुलकरचे दमदार पदार्पण

अर्जुन तेंडुलकरबद्दल बोलायचे तर त्याने रविवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच षटकात पाच धावा दिल्या त्याचे वडील सचिन तेंडुलकर यांनी 2009 मध्ये केकेआर विरुद्ध आयपीएलमध्ये पहिली ओव्हर टाकली होती आणि त्याने देखील केवळ पाच धावा दिल्या होत्या. अर्जुननेही आपल्या क्रिकेट करिअरची आयपीएल टीम मुंबई इंडियन्ससोबत सुरुवात केली आहे, आता आगामी सामन्यात त्याच्या खेळाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.