Armaan Kohli: अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस ७ मध्ये दिसलेला अभिनेता अरमान कोहलीला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. सुमारे १ वर्षापूर्वी अरमानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. तेव्हापासून अरमान तुरुंगात होता.(Armaan Kohli Gets Bail in drugs case after 1 year.)
काही चित्रपटांमध्ये काम केलेला आणि 'बिग बॉस' या टीव्ही रिअॅलिटी शोमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता अरमान कोहलीला ड्रग्ज प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. अरमानला गेल्या वर्षी २८ ऑगस्टला ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो तुरुंगात होता. कोर्टानं अनेकवेळा अरमानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अखेर आता तो मंजूर केला.
अरमानकडून कोकेन सापडले
अरमानला अटक करण्यात आली तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याच्याकडून १.२ ग्रॅम कोकेनही जप्त करण्यात आले. एनसीबीच्या या प्रकरणात एनडीपीएस कोर्टाने अरमान कोहलीचा जामीन अर्ज अनेकदा फेटाळला होता. आता उच्च न्यायालयाने अरमान कोहलीला एक लाख रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. तो लवकरच तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.
अरमान दारूच्या नशेत सापडला होता
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आपल्या छाप्यात अरमानच्या ठिकाणावर छापा टाकला होता. याठिकाणी केवळ आंतरराष्ट्रीय दर्जाची औषधेच सापडली नाहीत, तर अरमानही नशेच्या अवस्थेत सापडला आहे. यानंतर एनसीबीने एनडीपीएस कायद्याच्या कलम २१ (ए), २७ (ए), २८, २९, ३० आणि ३५ अंतर्गत अरमानला अटक केली.
आधीही तुरुंगात गेला होता...
अरमान कोहलीसोबत यापूर्वीही वाद झाले आहेत. जेव्हा तो टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस ७ मध्ये दिसला तेव्हा सोफिया हयातने त्याच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर अरमानला बिग बॉसच्या घरातच अटक करण्यात आली. मात्र, या प्रकरणात अरमानला नंतर जामीन मंजूर करण्यात आला. अरमान कोहली 'जानी दुश्मन' आणि 'प्रेम रतन धन पायो' सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.