Arshad Warsi : बाजार नियामक सेबीने बंदी घातल्यानंतर अभिनेता अर्शद अर्शदने ट्विटरवर लोकांना विनंती केली की, ''त्यांनी ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. त्याला आणि त्याची पत्नी मारिया गोरेटी यांना शेअर बाजाराबद्दल काहीही माहिती नाही.''
त्याने ट्विट केले आहे की, ''कृपया तुम्ही जी काही बातमी वाचत आहात त्यावर विश्वास ठेवू नका. मारिया आणि मला शेअर्सचे काहीही माहिती नाही.
सल्ला घेतल्यानंतर शारदामध्ये गुंतवणूक केली आणि इतर अनेकांप्रमाणे आम्हीही आमचे कष्टाचे पैसे गमावले."
अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेटी आणि इतरांवर युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करून दोन कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत हेराफेरी केल्याचा आरोप आहे.
सेबीने गुरुवारी अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया आणि साधना चॅनलच्या काही प्रमोटर्ससह 45 जणांना रोखे बाजारात व्यापार करण्यास बंदी घातली.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ला त्यांच्या तपासणीत आढळले की YouTube चॅनेलवर दिशाभूल करणारे व्हिडिओ पोस्ट करून गुंतवणूकदारांना साधना ब्रॉडकास्ट आणि शार्पलाइन ब्रॉडकास्टचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस करत होते.
अर्शदसह 45 जणांवर बंदी घालण्याबरोबरच, यूट्यूब चॅनलवर दिशाभूल करणारे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सेबीने बेकायदेशीरपणे कमावलेले 54 कोटी रुपये जप्त करण्याचे आदेशही दिले आहेत.
पुढील आदेशापर्यंत त्यांची कोणतीही मालमत्ता विकू नये, असेही त्यांना सांगण्यात आले आहे. दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओनंतर दोन्ही कंपन्यांच्या शेअरधारकांची संख्या अचानक वाढली.
एका व्हिडिओमध्ये अदानी समूहाने साधना खरेदी केल्याचा खोटा दावा :
अदानी समूह साधना ब्रॉडकास्ट विकत घेत असल्याचा दावा चॅनल्सवरील दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंमध्ये करण्यात आला होता.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये कंपनी चित्रपट निर्मितीकडे वाटचाल करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका मोठ्या अमेरिकन गुंतवणूकदाराने चार धार्मिक चित्रपटांच्या निर्मितीसाठी 1,100 कोटी रुपयांचा करार केला आहे. असा खोटा दावा व्हिडिओमध्ये केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.