आर्यन खान प्रकरण : मुंबई पोलिसांच्या हाती महत्वाचे कॉल रेकॉर्ड्स

Aryan Khan
Aryan KhanSakal media
Updated on

रोहीनी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : क्रुझ ड्रग्ज प्रकणात (cruise drug case) रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. प्रकरणातील पंच प्रभाकर साईल (prabhakar sail) यानी आर्यन खानला (Aryan khan) सोडवण्यासाठी शाहरुख खानकडे (shahrukh khan) पैसे मागितल्याचा गौप्यस्फोट केला होता. मुंबई पोलिसांची (Mumbai Police) एसआयटी आणि एनसीबी (SIT and NCB) दोन्ही संस्था याचा तपास करत आहेत. या तपासादरम्यान एसआयटीनं किरण गोसावी (kiran gosavi), सॅम डिसुझा (sam D'souza) आणि शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानी (pooja dadlani) यांचे कॉल रेकॉर्डस तपासले.

Aryan Khan
संघर्ष समितीकडून KDMC मुख्यालयासमोर मालमत्ता कराची होळी

यात ज्या दिवशी आर्यन खानला अटक केली त्या दिवशी हे तिघंही फोनवरुन एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहीती मिळाली. 3 ऑक्टोबरला आर्यन खानला एनसीबीनं अटक केली होती. त्यानंतर म्हणजे 2 ऑक्टोबरच्या रात्री आणि 3 ऑक्टोबरच्या सकाळी किरण गोसावी, सॅम डीसुझा आणि शाहरुख खानची मॅनेजर पुजा ददलानी यांच्यात वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन अनेकदा बोलणं झाल्याचं समोर आलं.

एनसीबीची SIT सक्रीय

दररोज नवनवीन घडामोडी घडणाऱ्या आर्यन खान प्रकरणात एनसीबीच्या SIT नं स्टार किड्स आणि सेलिब्रेटींना समन्स बजावायला सुरुवात केलीये. आर्यन खान जामिनावर सुटल्यानंतर एनसीबीच्या एसआयटीनं पुन्हा समन्स बजावलं होतं, पण तब्येत बरी नसल्यानं आर्यन येऊ शकत नसल्याचं सांगण्यात आलं. शाहरुख खानची मॅनेजर पुजा ददलानीलाही एनसीबीच्या SITनं समन्स बजावलं होतं, पण तिनंही तब्येतीचं कारण सांगुन यायचं टाळलं. पुजा ददलानी सोबतच चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे यालाही समन्स बजवण्यात आलं होतं त्यानं कोरोनाचं कारण सांगत हजर होण्याचं टाळलं. किरण गोसावी हा चिक्की पांडेच्या संपर्कात असल्यानं त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान आर्यन खान सोबत आरोपी असलेले अरबाज मर्चंट आणि अचित कुमार हे एनसीबी कार्यालयात हजर झाले होते, त्यांची काही वेळ चौकशीही करण्यात आली.

मुनमुन धामेचाचा न्यायालयात अर्ज

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना जामीन देताना कोर्टानं काही अटी घातल्या होत्या, त्यात दर मंगळवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याची एक अट होती. यासाठी मी दिल्लीची रहीवासी असून मला दिल्ली एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज मुनमुन धामेचानं मुंबई उच्च न्यायालयात नुकताच अर्ज दाखल केलाय. यावर अजून सुनावणी झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.