Asha Bhosle Tweet : 'काहीही विसरलेले नाही, लक्षात ठेवा या इंडस्ट्रीची मी शेवटची मुघल!'

वेगवेगळ्या रियॅलिटी शो मधून देखील आशाजी यांनी कलाकारांना मार्गदर्शन केले आहे. एवढेच नाहीतर लहान मुलांना देखील मोठ्या प्रेमानं त्यांनी समजावून सांगितले आहे.
Asha Bhosle bollywood Singer Tweet Viral
Asha Bhosle bollywood Singer Tweet Viral esakal
Updated on

Asha Bhosle bollywood Singer Tweet Viral : भारतीय संगीत विश्वात आपल्या आवाजानं वेगळी छाप चाहत्यांच्या मनात उमटविणाऱ्या गायकांमध्ये आशा भोसले यांचे नाव घेतले जाते. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ आशाजींनी भारतीय चाहत्यांना आगळा वेगळा सुरानंद दिला आहे. आता त्या त्यांच्या एका प्रतिक्रियेमुळे चर्चेत आल्या आहेत.

८९ वर्षे वय असणाऱ्या आशाजी यांचा उत्साह हा नेहमीच नवोदितांसाठी प्रेरणा देणारा ठरला आहे. त्या देखील त्यांच्या मनोगतातून वय हा माझ्यासाठी नेहमीच एक आकडा राहिला आहे. बाकी काही नाही. मात्र प्रत्येकवेळी आशाजींनी चाहत्यांना, नवीन कलाकारांना आणि इतर दिग्गज कलाकारांना मोठी शिकवण दिली आहे. कधीही कुणाची निंदा न करणे, नेहमी आपल्यापेक्षा मोठा कलाकाराचा मान ठेवणे, नवोदित कलाकारांचा उत्साह वाढवणे, त्यांना मार्गदर्शन करण्यात आशाजी अग्रेसर राहिल्या आहेत.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

वेगवेगळ्या रियॅलिटी शो मधून देखील आशाजी यांनी कलाकारांना मार्गदर्शन केले आहे. एवढेच नाहीतर लहान मुलांना देखील मोठ्या प्रेमानं त्यांनी समजावून सांगितले आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्टिटनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आशाजींना त्या ट्विटमधून नेमकं काय सांगायचे आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

आशाजी त्या ट्विटमध्ये म्हणतात की, मी बॉलीवूडमधील एकमेव अशी व्यक्ती आहे की, जिला बॉलीवूडचा सगळा इतिहास माहिती आहे. मी जर त्याविषयी सांगायला लागले तर मग तीन ते चार दिवस देखील मला अपूरे पडतील. मी काहीही विसरलेले नाही. मी या इंडस्ट्रीमधील शेवटची मुघल आहे. असेही आशाजी यांनी त्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.