Asha Parekh Dada Saheb Phalke Award : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना 2022 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. यापूर्वी त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 60-70 च्या दशकात आशा पारेख या केवळ चित्रपटांमुळेच नाही तर त्यांच्या मानधनामुळेही चर्चेत असायच्या. तेव्हाच्या काळात आशा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली.
ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) या अभिनय क्षेत्रात सक्रिय नसल्या तरी त्यांचा व्यवसायाचा व्याप मोठा आहे.अधून-मधून त्या टी.व्ही कार्यक्रमात परिक्षक किंवा गेस्ट म्हणून हजेरी लावताना दिसतात. आपल्या कामात अशा पद्धतीन त्या बिझी असल्या तरी त्यांचं सोशल मीडियाच्या कुठल्याच प्लॅटफॉर्मवर एकही अधिकृत अकाऊंट नाही. त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आवडत नाही आणि वयाच्या ७९ व्या वर्षी सोशल मीडिया(Social Media) जॉइन करुन त्रास होईल असे कुठलेच नवीन प्रयोग आपल्याला करायचे नाहीत असे मत त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. सोशल मीडियाचा अतिरेक आपल्याला आवडत नाही असेही त्या म्हणाल्या होत्या.
आशा पारेख त्यांच्या 'तिसरी मंझिल','दिल देके देखो','कटी पतंग','प्यार का मौसम','मेरा गाव मेरा देश','कारवॉं' अशा अनेक एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमांमुळे ओळखल्या जातात. त्यांनी राजेश खन्ना,शम्मी कपूर,जितेंद्र,धर्मेंद्र,अनिताभ बच्चन अशा अनेक बड्या स्टार्ससोबत काम केलं आहे. तसंच केवळ हिंदी नाही तर गुजराती,पंजाबी,कन्नड सिनेमांतूनही त्यांनी अभिनय केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.