ashi hi banwa banwi: २३ सप्टेंबर १९८८ ला मराठी चित्रपटसृष्टीत एका सोनेरी पानाचा उगम झाला. याच दिवशी राज्यात सर्वत्र ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. एवढी वषे उलटली तरी या चित्रपटाची जादू आजही कमी झालेली दिसत नाही. मराठी चित्रपटाच्या इतिहासात क्वचित एखाद्या चित्रपटाला असे भाग्य लाभले आहे. आज एवढय़ा वर्षांनंतरही मराठी प्रेक्षकांची प्रचंड पसंती या चित्रपटाला मिळते आहे. 'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट या सर्वांच्या आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तो आणि आजचा इंटरनेटचा जमाना यात जमीन-अस्मानाचे अंतर असले तरी आजच्या नेटकऱ्यांचीही तुफान पसंती या चित्रपटाला मिळाली आहे. (Ashi hi banwa banwi marathi movie complete 34 years cast sachin pilgaonkar asok saraf lakshmikant berde)
आजही हा चित्रपट टीव्ही लागला तरी तेवढ्याच आवडीने बघणाऱ्यांची संख्या कमी नाही. सचिन पिळगावकर यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, सुप्रिया पिळगावकर, सुशांत रे, निवीदेता सराफ, अश्विनी भावे आणि इतरही बऱ्याच कलाकारांचा सहभाग होता.
अफलातून कलाकार, विनोदी कथानक आणि सादरीकरणाचं कसब अशी सुरेख घडी बसल्यामुळे ही ‘बनवाबनवी…’ चांगलीच मुरली, जिची चव प्रेक्षकांमध्ये आजही रेंगाळत आहे. या चित्रपटाचे डॉयलाग आज पण मीम साठी वापरले जातात. धनंजय माने इथेच राहतात का? ह्याचं उत्तर जरी मिळालं नसलं तरी ते धनंजय माने इथेच राहतात का? च्या संवादांची जादू मात्र आज 34 वर्षानंतरही कायम आहे.
धनंजय माने आपल्या प्रत्येकाच्या हृदयात तितकेच कायम आहेत... सचिन पिळगांवकरांनी दिग्दर्शित केलेला आणि अशोक मामा, लक्ष्मीकांत बेर्डे ,सुधीर जोशी यांच्या अप्रतिम अदाकारीमुळे गाजलेला अशी ही बनवाबनवी सिनेमा पुढची अनेक वर्ष असाच सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवेल यात शंकाच नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.