Ashish Vidyarthi Second Wedding Rupali Barua Arth Son Reaction : बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना नेहमीच जिंकून घेणारे अभिनेते आशिष विद्यार्थी हे त्यांच्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे.
खलनायक म्हणून परिचित असणाऱ्या आशिष विद्यार्थी यांनी काही दिवसांपूर्वी दुसरा विवाह केला. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर विद्यार्थी हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलही झाले होते.
कित्येक नेटकऱ्यांना आशिष विद्यार्थी यांचे दुसरे लग्न हा खटकलेला विषय होता. विद्यार्थी हा त्यांचा वैयक्तिक विषय असला तरी सोशल मीडियावर नेटकऱ्यांना कोणताही विषय चर्चेसाठी आणि वादासाठी पुरेसा ठरतो. विद्यार्थी यांना प्रामुख्यानं त्यांच्या वयावरुन डिवचण्यात आले होते.
वयाची सत्तरी जवळ आली आणि तिशीच्या मुलीसोबत लग्न करणे हे तुम्हाला पटते का, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया विद्यार्थी यांना देण्यात आल्या होत्या.
Also Read - Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे
त्यावर विद्यार्थी यांनी देखील ट्रोल करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले होते. त्यांनी सांगितले की, तुम्ही मला म्हातारा का म्हणता आहात, आणि तुम्ही म्हणता तसे मला वागणे कसे काय शक्य होईल. तेव्हा माझ्यावर टीका करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. आम्हा दोघांना जे वाटले ते आम्ही केले. आम्ही घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. खूप आनंदातही असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी यांनी इंडिया टूडेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केली होती.
आता विद्यार्थी यांचा मुलगा अर्थ याची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अर्थनं देखील इंडिया टूडेला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या वर्षी विद्यार्थी यांचा राजोशी यांच्यासोबत घटस्फोट झाला होता. तर काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रसिद्ध डिझायनर रुपाली बरुआ यांच्याशी लग्न केले आहे.
माझ्या दुसऱ्या लग्नानंतर पहिली पत्नी आणि मुलगा अर्थ यांना नवल वाटणे स्वाभाविक आहे. कदाचित माझ्या मुलाच्या आयुष्यावर या गोष्टीचा परिणाम होऊ शकतो. असे मला वाटते.
यानंतर विद्यार्थी यांनी त्यांच्या मुलाला काय वाटते याविषयी सांगितलं आहे. जेव्हा तुमच्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत तेव्हा तुम्हाला तुमच्या जवळची माणसं देखील शत्रू वाटू लागतात. हेच मला माझ्या मुलाविषयी सांगायचे आहे. माझ्याकडून जे काही घडलं त्याबद्दल त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होणे साहजिकच आहे. आम्ही एकाच घरात एकत्र राहणे हे माझ्यासाठी अवघड होते. मी त्यात अपयशी ठरतो हे मला सांगायचे आहे. असेही विद्यार्थी यांनी सांगितले.
बाबाला अजून काय वाटते माहिती नाही, त्याला आमच्यापासून वेगळे राहायचे असेल कदाचित अशा प्रकारची प्रतिक्रिया अर्थची असू शकते. असेही विद्यार्थी यांनी आपल्या त्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.