Ashok Saraf: अशोक सराफांचं मोठं पाऊल, नाटकाच्या पडद्यामागील २० कलाकारांना दिले प्रत्येकी ७५ हजार

अशोक सराफ यांनी मराठी रंगभुमीवरील पडद्यामागील कलाकारांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतलाय
ashok saraf donate 75 thousand to marathi natak backstage artist at mumbai shivaji mandir theatre
ashok saraf donate 75 thousand to marathi natak backstage artist at mumbai shivaji mandir theatreSAKAL
Updated on

Ashok Saraf News: अशोक सराफ हे मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. अशोक सराफ हे अजुनही मराठी रंगभुमीवर कार्यरत आहे. अशोक सराफ यांनी मराठी रंगभुमीवरील पडद्यामागील कलाकारांसाठी मोठा निर्णय घेतलाय.

गेल्या वर्षी ४ जून रोजी अष्टपैलू विख्यात नट अशोक सराफ यांनी वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. त्यासाठी लाभलेल्या प्रायोजकत्व निधीचा विनियोग रंगमंच तंत्रज्ञ, कलावंत अशा वयोवृद्ध कलाकारांचा त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञतासन्मान करण्यासाठी करावा, अशी इच्छा अशोक आणि निवेदित सराफ यांनी व्यक्त केली. अखेर ही इच्छा अशोक सराफ यांनी पूर्ण केलीय.

ashok saraf donate 75 thousand to marathi natak backstage artist at mumbai shivaji mandir theatre
Prajakta Mali: आईशप्पथ, देवाची कृपा..! प्राजक्ता माळीच्या आनंदाला उधाण, म्हणाली.. बरे कर्म केले तर

पडद्यामागील कलाकारांना अशोक सराफ यांच्याकडून प्रत्येकी ७५ हजार

अशोक सराफ यांनी 'कृतज्ञ मी... कृतार्थ मी’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.शनिवार, २९ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा सन्मानसोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.), हा कार्यक्रम रंगला.

या कार्यक्रमात पडद्यामागील २० कलाकारांचा सन्मान करण्यात आला. अशोक सराफ यांच्याकडून या कलाकारांना प्रत्येकी ७५ हजार रुपये देण्यात आले. याशिवाय अमेरिकेत राहणारे संजय पैठणकर यांनीही १० लाखांची मदत केली.

पडद्यामागील या कलाकारांचा झाला सन्मान

उपेंद्र दाते (अभिनेते),

बाबा (सुरेश) पार्सेकर (नेपथ्यकार-प्रकाशयोजनाकार),

अर्चना नाईक (अभिनेत्री),

वसंत अवसरीकर (अभिनेते),

दीप्ती भोगले (गायिका-अभिनेत्री),

नंदलाल रेळे (ध्वनिसंयोजक),

अरुण होर्णेकर (दिग्दर्शक-निर्माते),

प्रकाश बुद्धिसागर (दिग्दर्शक),

पुष्पा पागधरे (पार्श्वगायिका),

वसंत इंगळे (अभिनेते),

सुरेंद्र दातार (संयोजक-निर्माते),

किरण पोत्रेकर (लेखक-दिग्दर्शक),

शिवाजी नेहरकर (लोकनाट्य कलावंत),

हरीश करदेकर (नाट्यकलावंत),

सीताराम कुंभार (नेपथ्य व्यवस्थापक),

विष्णू जाधव (नेपथ्य साहाय्यक),

एकनाथ तळगावकर (नेपथ्य सहायक),

रवींद्र नाटळकर (नेपथ्य सहायक),

विद्या पटवर्धन (अभिनेत्री),

उल्हास सुर्वे (नेपथ्य सहायक)

ashok saraf donate 75 thousand to marathi natak backstage artist at mumbai shivaji mandir theatre
Subhedar Movie: पुण्याच्या ट्रॉन अ‍ॅनिमेशन महाविद्यालयात ढोल ताशांच्या गजरात 'सुभेदार'चं भव्यदिव्य पोस्टर लॉंच

‘कृतज्ञ मी... कृतार्थ मी’ कार्यक्रम

‘कृतज्ञ मी... कृतार्थ मी’ या कार्यक्रमात मराठी नाट्यपरंपरेचे मूळ असलेल्या संगीत नाटकांबद्दल कृतज्ञता नाट्यपदे गाण्यात आली. मानसी फडके-केळकर व श्रीरंग भावे यांनी ती सादर केली. अरुण जोशी यांनी या कार्यक्रमाची स्क्रीप्ट लिहीली आहे.

अतुल परचुरे व डॉ. मृण्मयी भजक यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. ‘ग्रंथाली’च्या धनश्री धारप या कार्यक्रमाच्या संयोजिका होत्या. अशोक सराफ यांनी रंगभुमीवरील पडद्यामागील कलाकारांसाठी उचललेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.