ashvini mahangade from aai kuthe kay karte shared emotional post after mere sai serial end
ashvini mahangade from aai kuthe kay karte shared emotional post after mere sai serial end SAKAL

Ashvini Mahangade: मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांपर्यंत.. अनघा फेम अश्विनी महांगडेच्या पोस्टने चर्चांना उधाण

अश्विनी मालिका सोडणार अशी चिन्हं दिसत आहेत.
Published on

Ashvini Mahangade Aai Kuthe Kay Karte News: आई कुठे काय करते मालिका प्रेक्षकांच्या खास आवडीची. मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडेने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. अश्निनी जितकी उत्तम अभिनेत्री आहे तितकीच ती समाजभान जपत असते.

अश्विनी तिच्या रयतेचं स्वराज्य संस्थान प्रतिष्ठान तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. अशातच अश्विनी मालिका सोडणार अशी चिन्हं दिसत आहेत.

(ashvini mahangade from aai kuthe kay karte shared emotional post after mere sai serial end)

ashvini mahangade from aai kuthe kay karte shared emotional post after mere sai serial end
Kartik Aryan Buys Home: किंंमत १७ कोटी, ठिकाण जुहू, कार्तिक आर्यनने खरेदी केलं आलिशान घर

अश्विनीने सोशल मिडीयावर मालिकेने निरोप घेतल्याची बातमी शेअर केलीय. वाचकांना वाटलं असेल, आई कुठे काय करते मालिका संपणार का?

असं तुम्हाला वाटलं असेल तर थांबा, गैरसमज करुन घेऊ नका. अश्विनी काम करत असलेली मेरे साई ही मालिका ऑफ एयर जातेय. त्यानिमित्ताने अश्विनीने सोशल मिडीयावर भावुक पोस्ट घेतली आहे.

अश्विनी लिहीते.. मेरे साई...... (अप्रतिम अनुभव) परवा या हिंदी मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवून या मालिकेने समारोप केला. मी साधारण 1 वर्ष या मालिकेचा भाग होते. तसे पाहता ही माझी पहिली हिंदी मालिका.

खरे तर शब्द उच्चाराचे, पाठांतर होईल न, मला जमेल न अशा अनेक गोष्टींचे दडपण हे होतेच. मी प्रयत्न केले. तेजस्वीला मी स्वीकारले आणि तिने मला.

दशमीची आभारी आहे की मला एवढी मोठी संधी दिली. तसे पाहता निर्मिती संस्था, सहकलाकार, लेखक, संकलन विभाग, रंगभूषा, केशभूषा,

वेशभूषा संगीत विभाग, स्पॉट बॉईज आणि रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत सगळेच किती आणि कसे आभार मानायचे. मी कायम ऋणी राहीन. अशी पोस्ट अश्विनीने केलीय.

ashvini mahangade from aai kuthe kay karte shared emotional post after mere sai serial end
72 Hoorain: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 72 हुरे सिनेमाविषयी मोठा निर्णय, निर्मात्यांनी मानले आभार

मालिकांमधील लोकप्रिय चेहरा अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने काही दिवसांपुर्वी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

या आधी आपण अश्विनीला एका ऐतिहासिक भूमिकेत पाहिलेच आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत तिने संभाजी महाराजांच्या बहिणीची म्हणजे राणूअक्का यांची भूमिका साकारली होती.

आता पुन्हा एकदा अश्विनी ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. अश्विनीने आज याबाबत घोषणा केली.

अश्विनी तिच्या आगामी चित्रपटात अहिल्या बाई होळकर यांची भूमिका साकारणार आहे. 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' असे या चित्रपटाचे नाव आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.