Ashvini Mahangade: हा फोटो पाहून.. अश्विनी महांगडेने शेअर केली शाहीर साबळेंसोबतची खास आठवण

सध्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाची जोरदार चर्चा आहे..
Ashvini Mahangade shared post photos about memory of shahir sable maharashtra shaheer movie
Ashvini Mahangade shared post photos about memory of shahir sable maharashtra shaheer movie sakal
Updated on

Ashvini Mahangade Shared About Shahir Sable: केदार शिंदेंचा महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट उदय २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची सध्या सर्वांनाच उत्सुकता आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाविषयी लोक चर्चा करत आहे.

महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. तर अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत सिनेमात झळकणार आहे.

नुकताच महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. महाराष्ट्र शाहीर सिनेमात आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे सुद्धा झळकणार आहे. याच निमित्ताने तिने एक आठवण शेयर केली आहे.

(Ashvini Mahangade shared post photos about memory of shahir sable maharashtra shaheer movie )

Ashvini Mahangade shared post photos about memory of shahir sable maharashtra shaheer movie
Baloch Trailer: तर.. येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील की, इथं मराठ्यांच्या औलादी येऊन गेल्यात.. 'बलोच'चा दमदार ट्रेलर!

अश्विनीने शाहीर साबळे यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. यावेळी तिनं एक जुना फोटो शेयर केला आहे ज्यामध्ये महाविद्यालयीन जीवनातील अश्विनी आणि शाहीर साबळे यांचा फोटो दिसत आहे.

अश्विनी स्वतः वाईची असल्याने तिचे आणि साबळे यांचे एक वेगळेच नाते आहे. अशीच एक गोड आठवण अश्विनीने शेयर केली आहे.

अश्विनीने पोस्ट मध्ये लिहिलं आहे की, ''पद्मश्री शाहीर साबळे (बाबा) यांच्यासोबतचा हा फोटो .. किसनवीर महाविद्यालय, वाई मध्ये शिकत असताना एनएसएस कॅम्प मध्ये काढलेला हा फोटो.
'महाराष्ट्र शाहीर' फिल्म चे शूट संपल्यानंतर असेच पुस्तकं चाळत असताना त्यात कॉलेज वेळचा एक फोटो अल्बम सापडला ज्यात हा फोटो मिळाला..''

''ही खरंच एक गोड आठवण आहे. हा फोटो पाहून किती आनंद झाला हे शब्दात सांगू शकत नाही. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट 28 एप्रिल ला आपल्या भेटीस येत आहे. नक्की पहा.....'' अशा शब्दात अश्विनीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मध्यंतरीही अश्विनीने केदार शिंदे यांचा एक किस्सा शेयर केला होता. ज्यामध्ये तिने तिच्या बाबांची आठवण सांगितली होती. तिच्या वडिलांनी केदार शिंदे यांच्या नाटकात काम केले होते आणि आज ती शाहीर साबळे यांच्या चित्रपटात काम करत आहे असा योगायोग तिने शेयर केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.