'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतील कलाकारांसोबतच चाहतेही मिस करत होते नट्टू काकांना. म्हणूनच आता निर्मात्यांनी मालिकेत नवीन नट्टू काकांना आणायचं ठरवलं आहे. माहिती कळतेय की नवीन नट्टू काकांचा तपास पूर्ण झाला आहे. आणि शो मध्ये आता नवीन अभिनेता नट्टू काका साकारताना दिसणार आहे. मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी या नवीन नट्टू काकांची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. Tarak Mehta ka Ooltah Chashmah: Asit Modi Introduces All To New Nattu Kaka)
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. नवीन नट्टू काकांची झलक तिथं दाखवण्यात आली आहे. या पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोत असित मोदींसोबत जी व्यक्ती दिसत आहे,तीच आता तारक मेहता...मालिकेत नट्टू काका म्हणून दिसणार आहेत. पण असं असलं तरी मालिकेचे चाहते मात्र फारसे खूश दिसले नाही. या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, कुणीही दुसरा कलाकार घनश्याम नायक यांची जागा घेऊ शकत नाही,ज्यांनी नट्टू काका बनून आमचं खूप मोनरंजन केलं होतं'.
म्हणजे पुन्हा एकदा काका-पुतण्याची जोडी शो मध्ये रंग भरताना दिसणार आहे. आता मालिकेतलं इलेक्ट्रॉनिकचं दुकानही सुरू झालेलं दाखवलंय,जिथे नेहमी नट्टू काका दिसायचे. त्यामुळे दुकान सुरु झाल्यावर नट्टू काकांना आणायलाच हवं होतं. आता या दुकानात नट्टू काका आणि बाघा दोघं मिळून पुन्हा एकदा जेठालालला खूप त्रास देताना दिसणार आहेत. तसंच एकमेकांच्या सुख-दुःखात सामिल होतानाही दिसतील.
आपल्या सगळ्यांनाच कदाचित माहित असेल की 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत तब्बल १३ वर्ष घनश्याम नायक यांनी नट्टू काका(Nattu kaka) ही व्यक्तिरेखा साकारली होती. परंतु,गेल्याच वर्षी त्यांचे निधन झाले. खूप वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. ३ ऑक्टोबर,२०२१ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. घनश्याम नायक हे मालिकेतील इतर कलाकारांचे फेव्हरेट होते. त्यांच्या अंत्ययात्रेत शूटिंग बंद ठेवून जवळ-जवळ सर्वच सहकलाकारांनी हजेरी लावली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.