Aastad Kale on Wagh Nakh News: शिंदे-फडणवीस सरकारचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवरायांच्या वाघनखांबद्दल मोठी घोषणा केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली ही वाघनखं आणि भवानी तलवार ब्रिटनमधून परत आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. अशातच मराठमोळा अभिनेता आस्ताद काळेने सोशल मीडियावर पोस्ट केलीय जी चर्चेत आहे.
(aastad kale post on shivaji maharaj wagh nakh that maharashtra government)
आस्ताद काळेने सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलं पण...
आस्तादने सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहीलंय की, "वाघनखं" आपल्याकडे आली आहेत हे चांगलंच आहे. त्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचं मानापासून अभिनंदन आणि आभार.
पण ती आपल्याला "देऊन टाकली" नाही आहेत याची कृपया नोंद घ्यावी या ठिकाणी.
जगातील सर्व संग्रहालयं एकमेकांना स्वतःकडच्या वस्तू अशाप्रकारे काही काळापुरती देतच असतात. प्रचंड मोठी रक्कम deposit म्हणून यासाठी घेतली जाते. कागदोपत्री खूप काटेकोर आणि कायदेशीर व्यवहार त्यासाठी केला जातो.
आस्तादने उपस्थित केली शंका
आस्ताद पुढे मनातली शंका उपस्थित करताना लिहीतो, "आणि एक प्रामाणिक शंका आहे. जाणकारांनी कृपया निरसन करावं. नतद्रष्ट अफझुल्याचं पोट फाडायला हीच वापरली होती, याचा ठोस काही पुरावा सादर झाला आहे का? हे मी genuinely विचारतोय.
पुन्हा सांगतो, हा ऐतिहासिक ठेवा आत्ता स्वगृही असल्याचा आनंद निश्चितच आहे."
मराठी कलाकारांनी सुधीर मुनगंटीवारांची भेट घेऊन केलं अभिनंदन
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे ब्रिटन येथून भारतात आणण्यासाठीचा सामंजस्य करार यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल माननीय श्री सुधीर मुनगंटीवार (मंत्री सांस्कृतिक वनविभाग व मत्स्य विकास मंत्री) यांचा सत्कार समारंभ पर्णकुटी येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री सुभाष घई , महेश कोठारे, सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ ,शरद केळकर , संदीप कुलकर्णी , सौरव गोखले, शिव ठाकरे ,माधव देवचके ,भारत गणेशपुरे ,नूतन जयंत हे मराठी कलाकार उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.