Atal Bihari Vajpayee Biopic: मी राहो अथवा न रोहा मात्र हा देश राहिला पाहिजे त्यानं मोठी झेप घेतली पाहिजे. त्यासाठी वाट्टेल तो संघर्ष करण्यासाठी तयार आहे. असे वक्तव्य करणाऱ्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनसंघर्ष हा (Bollywood movie) अनेकांना माहिती आहे. त्यांचे राजकीय कौशल्य, त्यांचे कवित्व आणि सगळ्यात महत्वाचे त्यांचे वक्तृत्व हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा (Entertainment News) विषय आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट 2018 रोजी निधन झाले. आजही त्यांचे राजकीय विचार हे अनेकांना प्रेरणा देतात. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी व्टिटद्वारे ही माहिती दिली आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान म्हणून अटल बिहारी यांना ओळखले जायचे. त्यांचा (Social media news) करारीबाणा, आत्मविश्वास आणि संयमीपणा हा नेहमीच इतरांसाठी आदर्श होता. अटल बिहारी वाजपेयी हे साहित्यिक होते. कवी होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलु अटल नावाच्या बायोपिकमधून पाहायला मिळणार आहे. विनोद भानुशाली आणि संदीप सिंह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आज (Indian Politics) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. त्याचे मोशन पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. ते हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित करण्यात आले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच्या घोषणेसोबत असे सांगण्यात (biopic news) आले आहे की, अटल बिहारी वाजपेयी यांच्या 99 व्या जयंतीच्या निमित्तानं हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 25 डिसेंबर 2023 रोजी ही जयंती साजरी केली जाणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणातील काही ओळी उदधृत करण्यात आल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.