Atul Todankar thanks his friend director girish vasaikar : मराठी मनोरंजन विश्वात अनेक कलाकार पडद्यावर मित्राची भूमिका करत असतात. मात्र पडद्या मागेही त्यांची मैत्री कायम असते. अभिनेता अतुल तोडणकर (Atul Todankar) आणि दिग्दर्शक गिरीश वसईकर (Girish Vasaikar) या दोघांची अशीच मैत्री आहे. स्टार प्रवाहावरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अतुल हा कुक्कीची भूमिका करत आहे.
ही भूमिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. अतुलची कुक्कीची भूमिका कधी विनोदी, तर कधी समजूतदार अशी असते. एकत्र कुटुंब व्यवस्थेत व्यक्तीला वेगवेगळ्या स्थितीत समजूतदारपणाने वागावे लागते. कुक्कीच्या भूमिकेसाठी अतुलने सर्व श्रेय त्याचा मित्र आणि ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचा दिग्दर्शक गिरीश वसईकरला दिला आहे. (Marathi Entertainment News)
अतुल तोडणकरने आपल्या इन्स्टाग्रामवर गिरीश यांच्यासोबतचे छायाचित्र शेअर केले आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे, की जेव्हा तुमचे जुने मित्र तुमचे दिग्दर्शक असतात तेव्हा तुमच्याकडून ते अगदी सहजपणे उत्तम काम करुन घेतात. एकाच मालिकेत हा योग जुळून आलाय. त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. तुमच्यामुळेच कुक्की घडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.