Jawan: जवान बघायला गेलेली पाकिस्तानी मुलगी भडकली, थिएटर मालकांकडे पैसे परत देण्याची मागणी, व्हिडीओ व्हायरल

जवान बघायला गेलेल्या प्रेक्षकांसोबत एक अजब घटना घडलीय
Jawan: जवान बघायला गेलेली पाकिस्तानी मुलगी भडकली, थिएटर मालकांकडे पैसे परत देण्याची मागणी, व्हिडीओ व्हायरल
Jawan: जवान बघायला गेलेली पाकिस्तानी मुलगी भडकली, थिएटर मालकांकडे पैसे परत देण्याची मागणी, व्हिडीओ व्हायरलSAKAL
Updated on

Jawan News: जवान सिनेमा थिएटरमध्ये गाजतोय. जवान पाहायला अनेक फॅन्स थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. जवान सर्वांना आवडत आहे.

परंतु एक अशी घटना घडलीय ज्यामुळे फॅन्सनी जवान पाहून पैसे परत देण्याची मागणी केलीय, एका पाकिस्तानी मुलीने हा व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केलाय.

(audience watch jawan and demand to refund their ticket amounts)

Jawan: जवान बघायला गेलेली पाकिस्तानी मुलगी भडकली, थिएटर मालकांकडे पैसे परत देण्याची मागणी, व्हिडीओ व्हायरल
अरुण कदम यांच्या नातवाचं झालं बारसं, ठेवलं हे खास नाव

प्रेक्षकांनी जवान पाहून पैसे परत मागितले

सहार राशीदने एक रील व्हिडीओ शेअर केलाय. यात तिने सांगितले, "थिएटर मालकांनी मध्यंतरानंतरचा सिनेमा आधी दाखवला. आणि संपूर्ण सिनेमा १ तास १० मिनिटात संपवला. आम्ही विचार करतोय की खलनायक मेला, आता इंटरव्हल कसा होणार. आणि मग आम्हाला कळले की त्यांनी सुरुवातीचा भाग दाखवलाच नाही."

अशी अजब घटना घडल्याचं उघडकीस आलंय. या मुलीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच त्यावर कमेंट देखील व्हायरल झाल्या. यूजर्सनी कमेंट केल्या की, 'माफ करा, पण हे मजेदार आहे.' 'ही पीक कॉमेडी आहे, 'भारतात बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असलेला जवान असा खराब केल्याबद्दल त्यांच्यावर खटला चालवा. तुम्ही तिकीटाचे संपूर्ण पैसे परत घ्या.'

आव्हांडांकडून जवान चा विशेष शो

याच वर्षी जानेवारीमध्ये शाहरुखचा पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंही हजार कोटींची कमाई करुन मोठा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्यावेळी त्यावरुन मोठा वादही झाला होता. त्यातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही करण्यात आला होता. आता जवान चर्चेत आला आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कळवा-मुंब्रा मतदार संघातील १८ ते २५ वर्ष वयोगटातील तरुणांसाठी एक खास उपक्रम आयोजित केला आहे. त्याविषयी अधिक माहिती देणारी पोस्ट देखील त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, या जवानांसाठी शाहरुखच्या जवानचे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाहरुखचा जवान चित्रपट पाहता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.