Avdhoot Gupte to CM Eknath Shinde: 'महाराष्ट्र गीत' अशी ओळख असलेलं 'जय जय महाराष्ट्र माझा…' हे गीत प्रसिद्ध कवी राजा बढे यांनी लिहिलेलं . श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं तर कृष्णराव ऊर्फ शाहीर साबळे यांनी आपल्या खड्या आवाजात गायलं होतं.
गेल्या अनेक वर्षांपासून या गाण्यानं सबंध महाराष्ट्रीयन मनांवर राज्य केलेलं. याचे सूर वाजले की अंगात चैतन्य संचारलेच पाहिजे. आता तब्बल ६२ वर्षानंतर या गाण्याला महाराष्ट्राचं अधिकृत राज्यगीत म्हणून सम्मान मिळाला आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन मनाचा ऊर अभिमानानं भरून आला.
या गीताचं संगीतकार अवधूत गूप्तेनं देखील काही वर्षांपूर्वी म्हणजे त्याच्या करिअरच्या सुरुवातीस एक न्यू व्हर्जनही केलं होतं. (Avdhoot Gupte Letter to CM Of Maharashtra Eknath Shinde)
अवधूतचं ते न्यू व्हर्जन सुरुवातील काहींना खटकलं पण तेव्हाच्या ट्रेन्डनुसार अवधूतनं गाण्याला चढवलेला नवीन साज अनेकांच्या पसंतीसही उतरला. अवधूतच्या या गाण्यात त्यावेळी नववारी साडीचा साज घालून नटलेली तेव्हाची बॉलीवूड सुपरस्टार उर्मिला मातोंडकर पहिल्यांदा मराठी गाण्यात दिसली होती.
अवधूतनं आता या गाण्याला राज्यगीताचा सम्मान मिळाला म्हणून मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं एक आभार पत्र सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. ज्यात त्यानं प्रत्येक महाराष्ट्रीयन मनाचा ऊर भरून येईल अशा काहीशा भावना व्यक्त केल्या आहेत.
जय जय महाराष्ट्र माझा ह्या गीताला राज्यगीत म्हणून स्विकारण्याच्या निर्णयाचे मी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून प्रचंड कौतूक करतो.
महाराष्ट्राचा भौगौलिक,ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा सार्थ अभिमान या गाण्याच्या शब्दा शब्दात ठासून भरलेला आहे. तो अभिमान केवळ मराठी माणसा पुरतात मर्यादित न ठेवता संपूर्ण देशाला,किंबहुना जगाला सुद्धा ऐकू जाईल इतक्या आवाजात विविध प्रकारे,विविध ठिकाणी,विविध मार्गाने आणि विविध भाषांमधून दवंडी पिटवून सांगायला हवा.
आता राज्यगीताचा सम्मान राखणे हे बंधनकारक राहिल हे स्वागतार्ह. सादरीकरणाच्या नियमावलीमुळे या गीताचा जगभर पसरत असलेला परिमळ उलट प्रतिबंधीत होणार नाही,याची काळजी घ्यायला हवी.
काही वर्षांपूर्वी पुरोगामी विचारांनी भारताचा झेंडा फडकवण्याचे नियम शिथिल केल्यानं ज्याप्रकारे आता गल्लीबोळात,नाक्यानाक्यावर तिरंगा डौलात फडकताना दिसतो. त्याचप्रकारे आता हे नवीन महाराष्ट्र राज्यगीत महाराष्ट्राच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात सतत ऐकू येवो हीच आई एकविरेचरणी प्रार्थना!
जय जय महाराष्ट्र!
आपला
अवधूत गूप्ते
देशात सध्या केवळ १२ राज्यांचं स्वत:चं अधिकृत राज्यगीत आहे. त्यात आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीगसड, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, ओडिशा, पुद्दूचेरी, तामिळनाडू आणि उत्तरखंड या राज्यांचा समावेश आहे. आता या यादीत आपला महाराष्ट्र सामिल होणार आहे.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर तब्बल ६२ वर्षांनंतर महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळालं आहे. महाराष्ट्राची महती सांगणारं आणि मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारं 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत यापुढं महाराष्ट्राचे राज्यगीत असेल याहून अभिमानाची दुसरी कोणती गोष्ट असावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.