'राष्ट्रवादीच्या मंचावर शिवसेनेचे गाणे' अवधूत गुप्तेनं सांगितला धमाल किस्सा

दिग्दर्शक विजू मानेच्या 'जीवाचं रान इन मतदान' या टॉक शो मध्ये अवधूत गुप्ते सहभागी झाला होता.
Avdhoot Gupte
Avdhoot GupteInstagram
Updated on

दिग्दर्शक विजू मानेनं 'जीवाचं रान इन मतदान'(Jeevacha Raan In Matdan) हा नवा टॉक शो सुरु केला आहे. जो डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यानं रिलीज केला आहे. या शो च्या पहिल्या एपिसोडमध्येच राजकारणाविषयी अधिक माहिती असणारा आणि राजकीय नेत्यांच्या जवळ असणारा गायक-संगीतकार-दिग्दर्शक-निर्माता अवधूत गुप्तेला(Avdhoot Gupte) निमंत्रित केलं होतं. तेव्हा अवधूतनं त्याचा राजकीय नेत्यांशी कामाच्या निमित्तानं जो संपर्क आला,त्यावेळी आलेले अनुभव आणि धमाल किस्से देखील शेअर केले आहेत. याच कार्यक्रमात अवधूतनं शिवसेनेसाठी तयार केलेले शिवसेना गीत(Shivsena Song) राष्ट्रवादीच्या(NCP) मंचावर म्हणायला लागल्यावर काय पंचाईत आली होती याचा एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. लक्षात घेण्याजोगे म्हणजे १५ वर्षांपूर्वी महाविकास आघाडी असं काही नव्हतं बरं का. राष्ट्रवादी आणि शिवसेना हे राजकारणातले पक्के वैरी होते. (Avdhoot Gupte On Shivsena Song,Ncp Program,Memory)

अवधूत म्हणाला,''त्यावेळी शिवसेना गीत जेव्हा रिलीज झालं तेव्हा त्याची खूपच चर्चा झाली होती. लोकांना ते आवडलं होतं. लोकांच्या ओठांवर एखादं सिनेमातलं अजरामर गाणं १०० टक्के रेंगाळू शकतं पण एखाद्या राजकीय पक्षाचं गाणं ज्याच्या-त्याच्या मुखी बसलेलं मी पहिल्यांदाच पाहत होतो. त्यानंतर अनेक पक्षांनी मला त्यांच्यासाठी गाणं तयार करायला बोलावलं पण मी शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो. पण जेव्हा राष्ट्रवादीनं विचारलं तेव्हा मी रितसर उद्धव ठाकरेंची परवानगी मागितली आणि राष्ट्रवादीसाठी देखील गाणं तयार केलं''.

Avdhoot Gupte
'राजकारणी लोक वाईटच...', राजकारणावर अवधूत गुप्तेची 'खुपते' प्रतिक्रिया

अवधूत पुढे म्हणाला,''एकदा मला राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात बोलावलं होतं. तेव्हा तिथे गाण्याची फर्माईश झाली. मला वाटलं राष्ट्रवादी पक्षाचं गाणं गायचं असेल मी तयार केलेलं, पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फर्माईश आली शिवसेना गीत होऊन जाऊदे गुप्ते. मला एकदम खुपल्यासारखंच झालं अवधूत म्हणाला, हे काय म्हणतायत हे लोक. मी लगेच तिथल्या वरिष्ठ नेत्यांना याविषयी विचारलं,तेव्हा ते देखील म्हणाले होऊन जाऊ दे शिवसेना गीत,त्यात काय एवढं. हे ऐकून आपल्याला मात्र धक्का लागला होता असं अवधूत म्हणाला. राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी असूनही राष्ट्रवादीच्या मंचावर मी शिवसेनेचे गाणे गावे ही फर्माईश काही केल्या माझ्या पचनी पडत नव्हती. सारखं वाटत होतं,हेच का राजकारण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()