Avdhoot Gupte: भावनिक पोस्ट करत अवधूत गुप्तेनं मानले शासनाचे आभार! म्हणाला..

अवधूत गुप्तेच्या पोस्टनं वेधलं साऱ्यांचच लक्ष..
Avdhoot Gupte shared post for veteran singer asha bhosle for maharashtra bhushan award and say thanks to maharashtra government
Avdhoot Gupte shared post for veteran singer asha bhosle for maharashtra bhushan award and say thanks to maharashtra governmentsakal
Updated on

Avdhoot Gupte: जय जय महाराष्ट्र माझा म्हणत पारंपरिक संगीत आणि फ्यूजन यांचं उत्तम समीकरण साधारणा गायक म्हणजे अवधूत गुप्ते. केवळ गायकच नाही तर संगीत दिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि एक उत्तम चौकस कलाकार म्हणून अवधूत गुप्तेकडे पाहिले जाते.

अवधूतचं गाणं आलं आणि आपण नाचलो नाही असं क्वचितच होतं. नुकतच त्याने मनसे पक्षाचं नवं गाणं गायलं आणि सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली. लवकरच अवधूत नवा चित्रपट घेऊन येत असल्याचीही चर्चा आहे. अशातच त्याच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अवधूतने चक्क एक पोस्ट करत शासनाचे आभार मानले आहेत. त्याचे कारणही तितकेच खास आहे.

(Avdhoot Gupte shared post for veteran singer asha bhosle for maharashtra bhushan award and say thanks to maharashtra government)

Avdhoot Gupte shared post for veteran singer asha bhosle for maharashtra bhushan award and say thanks to maharashtra government
Sai Tamhankar: बॉयफ्रेंडचा फोटो दाखवताच सई ताम्हणकर लाजली.. निलेश साबळेने सगळंच सांगून टाकलं..

अवधूत आपल्या संगीताच्या कारकिर्दीत अनेक दिग्गजांना आपले गुरु मानत आला आहे. त्यापैकीच एक म्हणजे आशा भोसले. विशेष म्हणजे कालच एका भव्य दिव्य सोहळ्यात आशा भोसले यांना राज्य शासनाने 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान केला.

संगीत साधनेसाठी आणि 50 हून अधिक वर्ष हजारो गाणी गाऊन रसिकांची सेवा केल्याबद्दल राज्य शासनाने आशा ताईंचा सन्मान केला. गेट वे ऑफ इंडियाला हा दिमाखदार सोहळा पार पडला. त्यानंतर अवधूतने एक खास पोस्ट लिहिली आहे.

यामध्ये अवधूत म्हणाला आहे, 'गायन आणि पार्श्वगायन ह्यातील फरक ज्यांनी दाखवला व शिकवला.. पडद्यामागील आवाज हा पडद्यावरील चेहऱ्याचे सौंदर्य किती पटीने वाढवू शकतो, हे ज्यांनी वारंवार सिद्ध केले.. ज्यांचे प्रत्येक गीत हे पार्श्वगायकासाठी एक पाठ्यपुस्तक आहे.. प्रत्येक सादरीकरण हा प्रयोग आहे.. ज्यांचा जीवनप्रवास एक तपस्या आहे आणि कारकीर्द हा आदर्श आहे..'

'अशा, आशा भोसले नावाच्या ह्या विद्यापीठास #महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल संपूर्ण पार्श्वगायक परिवारातर्फे मी शासनाचे मनःपूर्वक आभार मानतो. आशाताई, चरणस्पर्श करुन हार्दिक अभिनंदन!!' अशा शब्दात अवधूतने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.