'गोरेपणाला भाव देणाऱ्या प्रॉडक्टची जाहिरात नकोच'

जाहिरातीविषयी अविकाला काही आक्षेप असल्यानं ती करण्यास नकार दिला होता.
avika gor
avika gor Team esakal
Updated on

मुंबई - टेलिव्हिजनवरील प्रसिध्द मालिका बालिका वधु (balika vadhu) ही प्रेक्षकांच्या पसंतीची मालिका आहे. त्या मालिकेचा प्रेक्षकवर्गही (serial audience) मोठा आहे. त्या मालिकेतील अभिनेत्री अविका गोरनं (avika gor) सोशल मीडियातून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं आपण यापुढे का कॉस्मॅटिक प्रॉडक्टची जाहिरात करणार नसल्याचेही सांगितले आहे. त्याचे कारणंही तिनं आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. ते कारण ऐकल्यावर चाहत्यांनी तिला धन्यवाद दिले आहे. त्या प्रॉडक्टच्या जाहिरातीविषयी अविकाला काही आक्षेप असल्यानं ती करण्यास नकार दिला होता. (avika gor aka anandi refuses to endorse beauty creams and said society cannot idolise one colour beauty)

गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या कॉस्मॅस्टिक प्रॉडक्टनं (cosmatic product) ज्याप्रकारच्या जाहिराती केल्या आहेत त्यावरुन वाद निर्माण झाल्याचे दिसून येते. गोरेपणा येण्यासाठी आमच्या कंपनीची क्रीम वापरा असा दावा अनेक कंपनी करतात. मात्र त्याचे साईड इफ्केटही दिसून आले आहेत. गोरेपणा म्हणजे सुंदरता याच्याशी अविका गोर ही काही सहमत नव्हती. त्यामुळे तिनं त्या जाहिरातीला नकार दिल्याची माहिती आहे. बालिका वधु, ससुराल सिमरन का आणि खतरो के खिलाडी सारख्या मालिकांधून अविकानं आपली वेगळी छबी तयार केली आहे.

अविकाचं म्हणणं आहे की, समाज काही एकाच रंगाची पूजा करु शकत नाही. सध्या बाजारात सौंदर्य वाढविण्यासाठीच्या ज्या क्रिम्स आहेत त्यांनी एक वेगळी मानसिकता तयार केली आहे. त्यामुळे असे वाटते की गोरं असणं म्हणजे सुंदरता. आणि त्यामुळे सक्सेस मिळते. त्यातून आपल्याला आत्मविश्वास मिळतो. मात्र हे पूर्णपणे चूकीचे आहे. आपला आत्मविश्वास हा आपल्या नैतिकतेतून आणि प्राप्त केलेल्या ज्ञानातून येतो.

avika gor
सुशांतच्या आयुष्यावरील चित्रपटाला स्थगिती नाही, कोर्टाने फेटाळली याचिका
avika gor
खासदार नुसरत जहांच्या रिलेशनशिपची चर्चा; यश दासगुप्ता आहे तरी कोण?

अविका म्हणते, आपल्या काही प्रवृत्तींमध्ये बदल होण्याची गरज आहे. आपण एकाच रंगाच्या मुर्तीची पूजा करु शकत नाही. मला पैशांची काळजी नाही. मात्र समाजावर वाईट परिणाम करणारी जाहिरात करणार नाही. त्यामुळे त्या जाहिरातीमध्ये काम करण्यास नकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.