BBM 3: 'स्नेहाचा मला अभिमान', आविष्कारची मुलाखत चर्चेत

आविष्कार दारव्हेकरची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल
Avishkar Darwhekar
Avishkar DarwhekarFile
Updated on

सध्या 'मराठी बिग बॉस ३' या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र आहे. कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धक काही ना काही कारणांवरून चर्चेत येत आहेत. तर काही स्पर्धक त्यांच्या भूतकाळातील घडलेल्या घटनांबद्दल बोलून प्रेक्षकांच्या मनात सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिग बॉसच्या घरात स्नेहा वाघ अनेकदा तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल भाष्य करताना दिसली. तर आता स्नेहाचा पूर्वाश्रमीचा पती आविष्कार दारव्हेकर याची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात आविष्कार त्याच्या आणि स्नेहाच्या नात्याबद्दल मोकळेपणाने व्यक्त झाला आहे.

आविष्कार काय म्हणाला?

"घटस्फोटानंतर माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर अनेक आरोप लावण्यात आले होते आणि तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की यावर काहीच बोलायचं नाही. कारण माझी आई नेहमी म्हणायची, की मुलींच्याविरुद्ध कधीच काही बोलायचं नाही. त्यामुळे समोर जे काही घडत होतं ते फक्त बघायचं आणि सारं निभावून घ्यायचं, असं मी ठरवलं होतं. पण या सर्व गोष्टींचा परिणाम माझ्या करिअरवर झाला. आजही मला स्नेहाशी केलेल्या लग्नाचा अजिबात पश्चाताप नाही. स्नेहानं तिचं करिअर घडवलं, स्वबळावर तिने यश मिळवलं आणि हे यश मिळवताना तिने कुठेही माझं नाव वापरलं नाही. तिने जे काही केलं ते तिच्या हिंमतीवर केलं. या गोष्टीचा मला नक्कीच अभिमान आहे. आम्ही विभक्त झाल्यानंतर जर तिने काहीच केलं नसतं तर मला वाईट वाटलं असतं. घटस्फोटानंतर मला खूप एकटं पडल्यासारखं वाटलं. पण याविषयी मी कधीच कुणाशीही चर्चा केली नाही", असं तो या मुलाखतीत म्हणाला.

Avishkar Darwhekar
डिसेंबरमध्ये विकीशी लग्न? कतरिनानं सोडलं मौन

स्नेहाने वयाच्या १९व्या वर्षी आविष्कारशी लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. स्नेहाने आविष्कारवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. "मी खूप वेदना सहन केल्या आहेत. पतीच्या मारहाणीला बळी पडणाऱ्या महिलांबद्दल मला खूप वाईट वाटतं", असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती. आविष्कारला घटस्फोट दिल्यानंतर सात वर्षांनी स्नेहाने दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. इंटेरिअर डिझायनर अनुराग सोलंकीसोबत तिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. मात्र हे लग्नसुद्धा फार काळ टिकलं नाही. आठ महिन्यांतच स्नेहा आणि अनुराग विभक्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.