वेब सीरिजमध्ये शिवीगाळचा अतिरेक, म्हणून नाकारतोय ऑफर्स- राजपाल यादव

राजपाल यादवने अद्याप ओटीटीवर पदार्पण केलं नाही.
Rajpal Yadav
Rajpal Yadav
Updated on

अभिनेता राजपाल यादवने (Rajpal Yadav) आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. कोरोना काळात अनेक कलाकारांना काम न मिळाल्याने घरी बसावं लागलं. मात्र या कठीण काळातही आपल्याला थोडंफार का होईना, काम मिळाल्याचं समाधान त्याने व्यक्त केलं. "वेब सीरिज (Web Series), सिनेमा आणि टीव्हीसारख्या क्षेत्रातील भविष्य उज्ज्वल आहे. या क्षेत्रात होणारे लक्षणीय बदल पाहून पुढील दहा वर्षांचा काळ हा सोनेरी काळ असेल असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही", असं राजपाल म्हणाला.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं, "कला जितनी बिखरती है, उतनी ही निखरती है. आपल्या देशात अशा वैविध्यपूर्ण संस्कृती, कथा आणि संकल्पना आहेत आणि त्यातील एक छोटासा भाग पडद्यावर येतो." राजपाल यादवला वेब सीरिजचे अनेक ऑफर्स मिळत आहेत. मात्र अद्याप त्याने ओटीटीवर पदार्पण केलं नाही. वेब सीरिजचे ऑफर्स आतापर्यंत का स्वीकारले नाहीत, असा प्रश्न विचारला असता तो पुढे म्हणाला, "मी फक्त माझ्या अटींवर काम करतो. वेब सीरिजमधील बोल्ड दृश्ये, शिवीगाळ यांच्या अतिरेकामुळे मी ऑफर्स नाकारल्या आहेत. कथेचा भाग असल्यास मी समजू शकतो, पण उगाचच लक्ष वेधण्यासाठी त्यांचा अतिरेक नसायला हवा. लहान मुलं, तरुण आणि वयोवृद्धांचंही मनोरंजन व्हावं, असं काम करण्याची माझी इच्छा आहे."

Rajpal Yadav
'गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू'; धनुषच्या वडिलांची घटस्फोटावर प्रतिक्रिया

ओटीटीने विशिष्ट वर्ग आणि खर्चाचा अडथळा दूर केल्याने प्रत्येकासाठी मनोरंजन परवणारं बनलं आहे, याचं समाधान राजपाल यादवने व्यक्त केलं. "सिनेमा हा सर्वसामान्यांना परवडणारा नाही. पण आज ओटीटीमुळे लंच ब्रेकदरम्यानही एखादा शेतकरी मनोरंजनाचा आस्वाद घेऊ शकतो. काही वर्षांपूर्वी त्यांच्यासाठी ही गोष्ट शक्य नव्हती. ही खऱ्या अर्थाने क्रांती आहे," असं तो पुढे म्हणाला. राजपाल यादव लवकरच 'भुल भुलैय्या २' आणि 'अर्ध' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.