Hema Malini : अयोध्येत होणार 'बसंती'चा परफॉर्मन्स! रामायणावर आधारित नाटिकेत कथ्थकचे सादरीकरण

बॉलीवूडची ड्रीम गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही.
Hema Malini Dance Drama Based On Ramayana
Hema Malini Dance Drama Based On Ramayanaesakal
Updated on

Hema Malini Dance Drama Based On Ramayana: बॉलीवूडची ड्रीम गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. शोले मधून बसंतीच्या भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ती भूमिका अजुनही प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय असतो. गेल्या चार दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये सक्रिय असणाऱ्या हेमा मालिनी यांनी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेयर केलीआहे.

हेमाजींचा खास परफॉर्मन्स...

२२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राममंदिराचे उद्घघाटन आणि प्रभु श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साऱ्या देशाला वेध लागले असून त्यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याच धर्तीवर १७ जानेवारी रोजी प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या कथ्थकचे सादरीकरण होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. इंडिया डॉट कॉमनं याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

१७ जानेवारीला होणार सादरीकरण...

हेमा मालिनी यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, प्रभु श्रीरामाच्या दर्शन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मी पहिल्यांदाच अयोध्येमध्ये येत आहे. त्याचा मला खूप आनंद आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भाविक या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होते. आता तो श्रीरामाच्या मंदिराचा योग येतो आहे. याचे समाधान आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं माझा एक खास परफॉर्मन्सही यावेळी होणार आहे.

१४ जानेवारीपासून गुरु पद्मविभुषण तुलसी पीठाधीश्वर जगत गुरु रामानंद स्वामी रामभद्राचार्य यांचा ७५ वा जन्मोत्सव साजरा केला जात आहे. त्याच्या औचित्यानं मी आणि माझी टीम अयोध्येमध्ये १७ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता रामायणावर आधारित एका नृत्य नाटिकेमध्ये सादरीकरण करणार आहे. असे हेमाजी यांनी यावेळी सांगितले.

Hema Malini Dance Drama Based On Ramayana
Kangana Reaction : 'तुम्हाला फक्त सेक्शुअल...' 'मिस्ट्री मॅन' बाबत कंगनानं केला मोठा खुलासा, काय म्हणाली माहितीये?

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला कोणकोण उपस्थित राहणार?

येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभु श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.त्यानिमित्तानं देशभरातील विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात बॉलीवूडच्या अनेक दिग्गज सेलिब्रेटींचाही समावेश आहे. बिग बी अमिताभ बच्चन, थलायवा रजनीकांत, कंगना रनौत, टायगर श्रॉफ, माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, रणबीर कपूर, रणवीर सिंग, धनुष, यश, प्रभास,रामचरण, रणदीप हुडा यांच्यासह इतर कलाकारांना बोलविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.