Ayodhya Ram Mandir: RSS मुंबई प्रमुखांच्या हस्ते आयुष्मानला मिळालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचं आमंत्रण

अयोध्या राम मंदिराचं आमंत्रण आयुष्मानला मिळालंय
ayodhya ram mandir inauguration invitation to ayushmann khurranna
ayodhya ram mandir inauguration invitation to ayushmann khurranna SAKAL
Updated on

Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारीला अयोध्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. देशातील तमाम जनता राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेची उत्सुक आहे. पंतप्रधान मोदींसह अनेक राजकीय नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

अशातच अयोध्या राम मंदिराचं अनेक कलाकारांना आमंत्रण जात आहे. अभिनेता आयुष्मान खुरानाला राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण मिळालंय.

ayodhya ram mandir inauguration invitation to ayushmann khurranna
Fighter Trailer: उन्हे दिखाना पडेगा बाप कौन है? अंगावर काटा आणणारा फायटरचा ट्रेलर बघाच!

बॉलिवूड स्टार आणि युवा आयकॉन आयुष्मान खुराना याला अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुंबई महानगर संपर्क प्रमुख, CA अजित पेंडसे यांनी 'राम लल्ला'च्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी आयुष्मानला वैयक्तिकरित्या निमंत्रण दिले आहे.

वृत्तानुसार, 22 जानेवारी रोजी 'प्राण प्रतिष्ठे'च्या निमित्ताने एक लाखाहून अधिक भाविक मंदिरात दर्शनासाठी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरात येणार आहेत.

या शुभ समारंभात आयुष्मान, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, रजनीकांत, मनमोहन सिंग, धनुष, मोहनलाल, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अजय देवगण, प्रभास, यश हे भारतीय चित्रपट उद्योगातील दिग्गज सामील होणार आहे. याशिवाय कलाकारांसोबतच मुकेश अंबानी, अनिल अंबानी, रतन टाटा, गौतम अदानी आणि टीएस कल्याण रामन इ. उद्योगपतीही सामील होणार आहेत.

ayodhya ram mandir inauguration invitation to ayushmann khurranna
Nach Ga Ghuma: संक्रांतीच्या मुहूर्तावर 'नाच गं घुमा'चा चित्रीकरण आरंभ! या लोकप्रिय अभिनेत्री झळकणार

अयेध्योतील राम मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडेल.

या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.