Ram Mandir Ravi Kishan Reaction : 'खबरदार, कुणी राम मंदिराबद्दल अपशब्द बोललं तर'..., अभिनेता रवि किशनला का आला एवढा राग?

प्रसिद्ध अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) हा नेहमीच त्याच्या परखड वक्तव्यामुळे चर्चेत (Ayodhya Ram Mandir Latest News) असणारा सेलिब्रेटी आहे.
Ayodhya ram mandir news actor and bjp mp ravi kishan
Ayodhya ram mandir news actor and bjp mp ravi kishan
Updated on

Ayodhya ram mandir news actor and bjp mp ravi kishan : प्रसिद्ध अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) हा नेहमीच त्याच्या परखड वक्तव्यामुळे चर्चेत (Ayodhya Ram Mandir Latest News) असणारा सेलिब्रेटी आहे. यापूर्वी त्याला त्याच्या वक्तव्यामुळे वेगळ्या प्रकारच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. आता त्यानं अयोध्येतील राम मंदिराबाबत (Ayodhya Ram Mandir Marathi News) जे कुणी प्रतिक्रिया देत त्यांच्यावर आगपाखड केली आहे.

रवि किशनचा अयोध्या के श्रीराम नावाचा व्हिडिओ आता प्रदर्शित झाला (Ayodhya Ke Shri Ram Music Video) आहे. त्याला त्याच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. भोजपूरी सिनेविश्वातील प्रचंड (Bhojpuri Actor Ravi Kishan) लोकप्रिय असणारं नाव म्हणून नेहमीच रवि किशनकडे पाहिलं गेले आहे. त्याची सोशल मीडियावर असणारी ख्याती मोठी आहे. तो बीजेपीचा खासदारही आहे. त्यानं राम मंदिराच्या निमित्तानं विरोधी पक्षांवर तोफ डागली आहे.

रविनं त्याच्या म्युझिक लाँचनंतर एबीपी न्युजशी संवाद साधला. त्यात त्यानं राम मंदिराबाबत जर कुणी अपशब्द बोलणार असेल तर त्याला (Ravi Kishan Latest Interview) त्याच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल. ते ऐकुन घेतले जाणार नाही. असे म्हटले आहे. राम मंदिराच्याबाबत कुणी काही खोटं बोलत असेल तर ते कसे आपण सहन करु, असा प्रश्न रवीनं यावेळी उपस्थित केला.

यावेळी त्यानं त्याच्या अयोध्या के श्री राम या अल्बमविषयी सांगितले. येत्या २२ जानेवारी रोजी जो मोठा सोहळा पार पडणार आहे त्यात सहभागी होता (Ayodhya Ram Mandir) येणार आहे याचा मनस्वी आनंद आहे. त्यानिमित्तानं मला एक अल्बमही प्रदर्शित करता आले याचे समाधान आहे. या अल्बमध्ये आपल्याला रॅप आणि अभिनयही करता आला याचा आनंद असल्याचे रविचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी राम मंदिराच्या निर्मिती प्रक्रियेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या प्रतिक्रियेनं वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती. त्यावर रवि किशननं त्यांना खडेबोल सुनावले आहे. तो म्हणाला की...अयोध्यात जिथे मंदिर बांधले जात आहे मी तिकडचा राहणारा आहे.

Ayodhya ram mandir news actor and bjp mp ravi kishan
Kangana Reaction : 'तुम्हाला फक्त सेक्शुअल...' 'मिस्ट्री मॅन' बाबत कंगनानं केला मोठा खुलासा, काय म्हणाली माहितीये?

सध्या राम मंदिराविषयी जे कुणी खोटं बोलत आहे किंवा खोटी माहिती जाणीवपूर्वक पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना माफ केलं जाणार नाही. ते कसे सहन करायचे असा प्रश्न रविनं यावेळी उपस्थित करुन लक्ष वेधून घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.