Ayodhya Ram Mandir: "जे लोक रामाला नाकारत आहेत ते...", अयोध्येत रामायण मालिकेतील कलाकार एकत्र

अयोध्या राम मंदिर सोहळ्यासाठी रामायण मालिकेतील कलाकार एकत्र आले आहेत
Ayodhya Ram Mandir the cast of the Ramayana arun govil sunil lahri dipika chikhlia together in Ayodhya
Ayodhya Ram Mandir the cast of the Ramayana arun govil sunil lahri dipika chikhlia together in Ayodhya SAKAL
Updated on

Ayodhya Ram Mandir: रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल, माता सीतेची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लाहिरी मंगळवारी अयोध्येत पोहोचले.

राम मंदिर सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सर्व कलाकार अयोध्येत पोहोचले आहेत. याशिवाय 'हमारे राम आयेंगे' या गाण्याच्या शूटिंगमध्येही भाग घेणार आहे.

Ayodhya Ram Mandir the cast of the Ramayana arun govil sunil lahri dipika chikhlia together in Ayodhya
Shah Rukh Khan: सलमानच्या जागी किंग खान! 'देवदास'नंतर भन्साली - शाहरुख पुन्हा एकत्र?

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अरुण गोविल म्हणाले की, "अयोध्येचे राम मंदिर राष्ट्रीय मंदिर असल्याचे सिद्ध होईल. गेल्या काही वर्षांत जी संस्कृती लोप पावत चालली होती. ती आपल्या संस्कृतीचा वारसा आहे. याची संपूर्ण जगाला कल्पना येईल. हे मंदिर प्रेरणास्थान ठरेल. ते आपल्या श्रद्धेचे केंद्र आहे आणि तो आपला अभिमान असेल. हीच आपली ओळख बनेल."

गोविल पुढे म्हणाले, "अयोध्येत राम मंदिर बांधले जाईल हे माहितच होतं. परंतु प्रभू राम लल्लांचा अभिषेक अशा प्रकारे होईल. आणि संपूर्ण देश या घटनेचा साक्षीदार होईल असे वाटले नव्हते. माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी घटना आहे. संपूर्ण देश राममय होईल, जिथे लोक रामावर विश्वास ठेवतील, तिथे आनंदाचे वातावरण असेल, याची कल्पनाही केली नव्हती. म्हणूनच याची अनुभूती खूप आनंददायी आहे. आपण अशा क्षणाचे साक्षीदार होणार आहोत, ज्याचा आपण विचारही केला नव्हता."

लक्ष्मणची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लाहिरी म्हणाले, "मी प्राण प्रतिष्ठा महोत्सवात सहभागी होत आहे. मी खूप भाग्यवान आहे, मला जे माहित नव्हते ते जाणून घेण्याची संधी मला मिळत आहे. देशात निर्माण झालेले वातावरण अतिशय धार्मिक आणि अतिशय सकारात्मक आहे. यामुळे जगाला खूप सकारात्मक भावना मिळेल."

सुनील लाहिरी यांनी पुढे वक्तव्य केलं की, "जे लोक रामाला नाकारत आहेत ते अज्ञानी आहेत. त्यांना राम म्हणजे काय ते माहीत नाही. जोपर्यंत कोणी रामायण वाचत नाही तोपर्यंत प्रभू रामाबद्दल माहिती मिळणार नाही. श्रीराम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम. मर्यादेत राहायला हवं, हे रामायणही शिकवतं. ही शिकवण राम नाकारणाऱ्यांना माहीत नाही."

'रामायणातील पात्रांना प्रेम मिळत राहील'

रामायणात सीतेची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया म्हणाली, "आमची प्रतिमा लोकांच्या हृदयात स्थिरावली आहे, राम मंदिर बांधल्यानंतरही त्यात काही बदल होईल, असे मला वाटत नाही. आम्हाला लोकांनी भरभरून प्रेम दिले आहे. रामायणातील पात्रांना असेच प्रेम मिळत राहील."

२२ जानेवारी होणाऱ्या राम मंदिर सोहळ्यासाठी हे कलाकार एकत्र आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.