Ayushman Khurana: ट्रेनमध्ये गाणी गाणारा आता बॉलीवूडचा 'आयुषमान'

नव्या पिढीच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्या अभिनेत्याचे नाव अग्रक्रमानं घ्यावे लागेल. त्यानं त्याच्या अभिनयाच्या जोरावर सगळ्यांना आपली दखल घ्यायला भाग पाडले.
ayushman khurana news
ayushman khurana news esakal
Updated on

Ayushmann Khurrana News: नव्या पिढीच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्या अभिनेत्याचे नाव अग्रक्रमानं घ्यावे लागेल. त्यानं त्याच्या अभिनयाच्या जोरावर सगळ्यांना आपली दखल घ्यायला भाग पाडले. तो आयुषमान झाला. विकी (Bollywood News) डोनरपासून त्यानं प्रेक्षकांना आपलेसे केले होते. त्याचा सहजसुंदर अभिनय, त्याच्याकडे असलेलं गायनाचं कौशल्य, त्याचं दिसणं हे सारं काही प्रेक्षकांना कमालीचं भावलं. त्यामुळेच की काय आयुषमान खुराणा हा (Social Media News) नेहमीच चर्चेत असणारा अभिनेता झाला. बिग बी अमिताभ यांच्याबरोबर गुलाबो सिताबोमध्ये तो चमकला. अभिनयाची वेगळी झलक त्यात पाहायला मिळाली होती.

आयुषमाननं ज्या ज्या चित्रपटांमध्ये भूमिका केली त्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यानं त्या प्रत्येक भूमिकेतील वेगळेपणा जपला. आपल्या भूमिकांमध्ये तोचतोचपणा येणार नाही याची काळजी त्यानं घेतली. अन्यथा काही अभिनेते एकाच साच्यातील भूमिका त्याच त्या रटाळपणानं करतात. याचा परिणाम त्यांच्या ब्रँड इमेजवर होते. तसे आयुषमानचे झाले नाही. भलेही त्याचा चेहरा हा सालस, निरागस दिसत असेल मात्र अंधाधून, आर्टिकल 15 सारख्या चित्रपटांमधून त्यानं आपण गंभीर स्वरुपाच्या भूमिका देखील साकारु शकतो हे दाखवून दिले.

आज आयुषमानचा जन्मदिवस. त्यानिमित्तानं त्याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी तो लाईमलाईटमध्ये आला. बघता बघता त्यानं बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता होण्याइतपत स्वताचे वेगळे वलय निर्माण केले. एका रियॅलिटी शोमध्ये तो पॉपस्टार झाला. त्याला विजेतेपद मिळालं होतं. तेव्हापासून त्याचं नशीब उजळलं. आयुषमानच्या बाबत एक गोष्ट कुणाला सांगून खरी वाटणार नाही. म्हणजे करिअरच्या सुरुवातीच्या काळात ट्रेनमध्ये गाणी म्हणायचा. त्यातून जी कमाई होईल यावर त्याचं जगणं सुरु होतं. आयुषमानचे वडील हे ज्योतिषी. आई गृहिणी. अशा मध्यमवर्गीय परिस्थितीतून आलेल्या आयुषमानचा संघर्ष मोठा आहे.

ayushman khurana news
Malaika Arora: कुणी काही का म्हणेना तिचं दिसणं 'नादखुळा!'

त्यानं आपल्या करिअरची सुरुवात एमटीव्हीच्या रोडीज शोपासून केली होती. तो दुसऱ्या सीझनचा विजेताही होता. कपिल शर्माच्या शोमध्ये आयुषमाननं आपली संघर्षगाथा सांगितली होती. त्यात तो म्हणाला होता की, मला सुरुवातीच्या काही दिवसांत ट्रेनमध्ये गाणी म्हणावी लागली. कारण माझ्याकडे पैसेच नव्हते. आज एका चित्रपटासाठी आयुषमान दहा कोटी रुपये घेतो असे बोलले जाते. 2012 मध्ये सुजित सरकार यांच्या विकी डोनरपासून त्यानं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तो चित्रपट प्रेक्षकांना आवडला होता. त्यातील आयुषमानची भूमिकाही प्रेक्षकांना भावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.