Ayushamann Kharrana : ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांसोबत आयुषमान करणार 'राष्ट्र उभारणी'वर चर्चा!
Ayushmann Khurrana News: बॉलीवूडमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणून आयुषमानकडे पाहिले गेले आहे. (Ayushmann Khurrana Latest news) विकी डोनर ते ड्रीम गर्ल २ पर्यतचा त्याचा प्रवास हा खूपच प्रेरणादायी आहे. सध्या आयुषमान हा चर्चेत येण्यामागील कारण म्हणजे त्याचा ग्लोबल पातळीवर गौरव झाला आहे.
आयुषमानसह क्रीडा आणि हॉलीवूडमधील आणखी काही मान्यवरांचा देखील त्या स्तरावर झालेला गौरव हा चर्चेचा विषय आहे. मात्र त्यात सर्वाधिक चर्चा होत आहे ती आयुषमानची. आयुषमान हा केवळ अभिनेता नसून आज त्याच्याकडे भारताचा युथ आयकॉन म्हणूनही पाहिले जात आहे. त्यामुळेच की काय त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे.
आयुष्माननं देशावर महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभाव पाडला आहे. सर्वसमावेशकतेला प्राधान्य देणाऱ्या आणि राष्ट्र उभारणीत योगदान देणाऱ्या त्यांच्या वेगळ्या विषयांवरील चित्रपटांनी त्याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. आता प्रतिष्ठित टाइम मासिकाने आयुष्मानच्या कर्तृत्वाची दखल घेत त्याला जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नाव दिले आहे. राष्ट्र उभारणीतील योगदान आणि मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना टाइम ने ‘टाइम इंपॅक्ट पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे.
आयुष्मानची भारत स्पेशल ऑलिम्पिकसाठी सदिच्छा दूत म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. तो सध्या भारतासाठी युनिसेफचे राष्ट्रीय राजदूत आहेत आणि सॉकर दिग्गज डेव्हिड बेकहॅम यांच्यासोबत संयुक्तपणे EVAC - एरेडिकेशन ऑफ व्हायोलन्स अगेन्स्ट चिल्ड्रन - या महत्त्वाच्या उपक्रमाचे प्रमुख आहेत!
जीवनाच्या विविध क्षेत्रातील त्यांचे योगदान इतके आहे की आयुष्मानला आता ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट, बॅडमिंटन आयकॉन पुलेला गोपीचंद, अमीर हुसैन लोन - जम्मू आणि काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार, आणि इतर दिग्गजांसह भविष्यासाठी राष्ट्र उभारणी या विषयांवर चर्चा करण्यासाठी सामील करण्यात आले आहे!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.