Ayushmann Khurrana Fact Check : 'तो' व्हिडिओ पाकिस्तानचा नव्हे तर दुबईतला! काय आहे सत्य?

प्रसिद्ध अभिनेता आयुषमान हा जसा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो तसेच तो त्याच्या बहारदार गायकीसाठी देखील चर्चेत असणारा कलावंत आहे.
Ayushmann Khurrana Pakistani song video goes viral
Ayushmann Khurrana Pakistani song video goes viralesakal
Updated on

Ayushmann Khurrana Pakistani song video goes viral : प्रसिद्ध अभिनेता आयुषमान हा जसा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो तसेच तो त्याच्या बहारदार गायकीसाठी देखील चर्चेत असणारा कलावंत आहे. नुकताच तो अयोध्येतील राम मंदिर उद्घघाटन सोहळ्याला हजर होता. त्याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर मात्र तो एका व्हिडिओमुळे नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय ठरत आहे.

आयुषमाननं जे काही केलं ते त्याच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना आवडलेलं नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर आगपाखड केली आहे. आयुषमाननं एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानचे एक गाणे गायले त्यामुळे त्याच्यावर आगपाखड केली जात आहे. नेटकऱ्यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

Ayushmann Khurrana Pakistani song video goes viral
Kangana Viral Post : 'काय मुर्खपणा चालवलाय? एखाद्या तरुणीला दरवेळी नव्या पुरुषासोबत...' कंगना प्रचंड संतापली!

तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आयुषमानवर नेटकऱ्यांनी त्याच्यावर उलट सुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत. आयुषमाननं पाकिस्तानी गायक कैफीचं प्रसिद्ध गाणं दिल दिल पाकिस्तान, जान जान पाकिस्तान नावाचे गाणे गायले. त्यामुळे तो वादाचा विषय ठरतो आहे. जनसत्तानं याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

काय आहे त्या व्हिडिओमागील सत्य?

खरं तर त्या व्हिडिओमध्ये आयुषमाननं दिल दिल पाकिस्तान नावाचे गाणे गायले ही गोष्ट खरी आहे. त्या कॉन्सर्टमध्ये त्याचा भाऊ अपारशक्ति खुराना देखील स्टेजवर असल्याचे दिसते. मात्र तो व्हिडिओ हा पाकिस्तानातील नसून दुबईतील असल्याचे सांगण्यात येत आहे. २०१७ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कॉन्सर्टमध्ये आयुषमाननं ते गाणं गायलं होतं. यावेळी आयुषमाननं त्या कॉन्सर्टमध्ये 'चक दे इंडिया' नावाचे गाणेही गायले होते.

यावेळी आयुषमाननं आशियायाई देश ज्यात बांग्लादेश, श्रीलंका, भारत आणि पाकिस्तान या देशांना ट्रीब्युट केले होते. मात्र या सगळ्यात त्याचे दिल दिल पाकिस्तान नावाच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. दुसरीकडे असंही म्हटलं जात आहे की, आयुषमाननं पाकिस्तानला भेट देत ते गाणे गायले होते. मात्र ते वृत्त खोटे असून ते गाणे दुबईमध्ये झालेल्या आशियाई देशांच्या एका कॉन्सर्टमधील आहे. असे फॅक्ट चेकमधून दिसून आले आहे. न्यूज रुम पोस्टनं फॅक्ट चेक करत याबाबत त्या गोष्टीची शहानिशा केली आहे.

Ayushmann Khurrana Pakistani song video goes viral
Ranbir Kapoor Viral Video : श्रीरामाच्या दर्शनाला आला की कतरिना सोबत फोटो काढायला? रणबीरच्या 'त्या' सेल्फीची चर्चा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.