Best Movies on Ambedkar: डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी साजरी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. देशाचे संविधानाचे निर्माते आहे. 1891 मध्ये या दिवशी मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेबांचा जन्म झाला. आंबेडकरांना जन्मापासूनच सामाजिकदृष्ट्या जातीय भेदभावाला सामोरे जावे लागले.
बाबासाहेबांनी दलित आणि दुर्बल घटकातील लोकांसाठी खूप संघर्ष केला. लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी असलेले बाबासाहेब आंबेडकर एक न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जाऊ लागले.
आंबेडकर जयंती 2024 च्या निमित्ताने त्यांच्यावर बनविण्यात काही चित्रपटांवर एक नजर टाकूया.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर:
2000 मध्ये आलेली ही फीचर फिल्म जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केली होती. आंबेडकरांची भूमिका मामूट्टी यांनी केली होती. या चित्रपटाला इंग्रजीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म, सर्वोत्कृष्ट अभिनेता मामूट्टी आणि सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले.
रमाबाई भीमराव आंबेडकर:
प्रकाश जाधव दिग्दर्शित रमाबाई भीमराव आंबेडकर हा २०११ चा मराठी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट आहे. निशा परुळेकर, गणेश जेठे, दशरथ हातिसकर आणि स्नेहल वेलणकर यांनी या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
डॉ बी आर आंबेडकर:
शरण कुमार कब्बूर दिग्दर्शित डॉ बी आर आंबेडकर हा कन्नड भाषेतील 2005 सालचा चरित्रात्मक चित्रपट आहे. या चित्रपटात विष्णुकांत बीजे आंबेडकर आणि तारा त्यांची पहिली पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्या भूमिकेत आहेत, भव्या त्यांची दुसरी पत्नी सविता आंबेडकर यांच्या भुमिका होत्या .
भीम गर्जना:
भीम गर्जना हा 1989 चा सुधाकर वाघमारे दिग्दर्शित मराठी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट आहे. या चित्रपटात कृष्णानंद आणि प्रतिमा देवी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. भारतीय राज्यघटनेची पहिली आवृत्ती तयार करताना भारताच्या भवितव्याबद्दलच्या त्यांच्या विचारधारा आणि त्यांच्या विचारांबद्दल त्याची कथा सांगते.
बाळ भीमराव:
बाळ भीमराव हा प्रकाश नारायण जाधव दिग्दर्शित मराठी भाषेतील 2018 चा चरित्रात्मक चित्रपट आहे. या चित्रपटात मोहन जोशी, विक्रम गोखले, किशोरी शहाणे विज, प्रेमा किरण आदी कलाकारांचा समावेश होता.
जयंती:
‘जयंती’ या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुमोल विचारसरणीवर भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटात तितिक्षा तावडे, मिलिंद शिंदे, किशोर कदम यांसारख्या मातब्बर कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.