Bad News: 'अ‍ॅनिमल'मधील भाभी-2 देणार ‘बॅड न्यूज’; विकी कौशल आणि तृप्ती डिमरीच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

Bad News: 'बॅड न्यूज' या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. | First look release of Vicky Kaushal and Tripti Dimri's upcoming film...
Bad News
Bad News esakal
Updated on

Bad News: अक्षय कुमार (Akshay Kumar), करिना कपूर (Kareena Kapoor), कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) यांच्या गुडन्यूज या चित्रपटानंतर आता बॅड न्यूज (Bad News) हा चित्रपट रिलीज होणार आहे.धर्मा प्रोडक्शनच्या 'बॅड न्यूज' या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.

'बॅड न्यूज' या चित्रपटामध्ये 'अ‍ॅनिमल' या चित्रपटातील भाभी-2 म्हणजेच तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या चित्रपटात एमी (Ammy Virk) हा देखील दिसणार आहे. करण जोहरनं बॅड न्यूज चित्रपटातील विकी, तृप्ती आणि एमीच्या फर्स्ट लूकचा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "सर्वात मनोरंजक हंगामा पाहण्यासाठी सज्ज व्हा, खऱ्या घटनांवर प्रेरित कॉमेडी! 19 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार बॅड न्यूज"

विकी कौशलनं देखील सोमवारी (18 मार्च) 'बॅड न्यूज' या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. विकीनं चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "या सोमवारी एकच गुडन्यूज आम्ही तुम्हाला देत आहोत, ती म्हणजे बॅड न्यूज येत आहे! मस्ती, मज्जा आणि खूप गोंधळाने भरलेली बॅड न्यूज!"

Bad News
Murder Mubarak Review: दमदार कथा पण कलाकारांच्या अभिनयामुळे गंडला 'मर्डर मुबारक'; वाचा रिव्ह्यू

कधी रिलीज होणार 'बॅड न्यूज'?

बॅड न्यूज हा चित्रपट 19 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विकी,तृप्ती आणि एमी यांच्याभोवती या चित्रपटाची कथा फिरताना दिसेल. विकी आणि एमी दोघेही तृप्तीच्या प्रेमात पडतात त्यानंतर काय घडतं? हे बॅड न्यूज चित्रपटात दाखवण्यात येणार आहे, असा अंदाज चित्रपटाचं पोस्टर पाहून लावला जाऊ शकतो.

2019 मध्ये करण जोहर आणि अपूर्व मेहता यांच्या संयुक्त निर्मितीमध्ये गुडन्यूज हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी होते. रिपोर्टनुसार, गुडन्यूज या चित्रपटाच्या संकल्पनेला ट्विस्ट देत, त्याच निर्मात्यांनी आता बॅड न्यूज या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट रसिकांना किती आवडतो? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Bad News
Yed Lagla Premach: पंढरपुरच्या राया आणि मंजिरीची हटके प्रेमकहाणी; 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेचा प्रोमो पाहिलात?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.