'बागबान' चित्रपटाचे लेखक शफीक अन्सारी कालवश

'बागबान' चित्रपटाचे लेखक शफीक अन्सारी कालवश

बॉलीवूडमधील प्रसिद्ध पटकथा लेखक शफीक अन्सारी यांचे आज मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले.
Published on

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिद्ध पटकथा लेखक शफीक अन्सारी यांचे आज मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून जे आजारी होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निकटवर्तीयांनी सोशल मीडियावर व्टीट करुन ते निवर्तल्याची बातमी दिली आहे. त्यानंतर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शफीक अन्सारी यांचे चिरंजीव मोहसिन अन्सारी त्यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावरुन दिली आहे. शफीक यांच्या पार्थिवावर मुंबईतील ओशिवारातील दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शफीक यांनी 1974 मध्ये आपल्या चित्रपट प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांनी स्क्रीन रायटर म्हणून सुरुवात केली. ज्यामुळे ते लोकप्रिय झाले. त्यांनी सुरुवातीला दोस्त नावाच्या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली होती. त्यामध्ये मुख्य अभिनेता म्हणून धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यानंतर त्यांनी 1990 मध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या दिल का हीरा चित्रपटाची देखील स्क्रिप्ट लिहिली होती. दिलीप कुमार, गोविंदा आणि माधुरी यांच्या प्रसिद्ध इज्जतदार चित्रपटाची पटकथा लिहून शफीक हे प्रसिद्ध झाले होते.

2003 मध्ये आलेल्या अमिताभ आणि हेमा मालिनी यांच्या प्रसिद्ध बागबान या चित्रपटाचे लेखन शफीक यांनी केले होते. त्यामध्ये सलमान खान आणि महिमा चौधरी यांच्याही भूमिका होत्या. त्यावर्षीची सर्वाधिक हिट मुव्ही म्हणून बागबानचा उल्लेख केला जातो. त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. वयाच्या 84 व्या वर्षी अन्सारी यांनी अखेरचा श्वास घेतला. ते मुंबईतील अंधेरी या भागात राहत होते.

'बागबान' चित्रपटाचे लेखक शफीक अन्सारी कालवश
वयाच्या 80 व्या वर्षी अमिताभ एवढे उत्साही कसे, जाणून घ्या कारणं
'बागबान' चित्रपटाचे लेखक शफीक अन्सारी कालवश
हेमा मालिनी यांनी सांगितल्या अफगाणिस्तानमधल्या शूटिंगच्या आठवणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()