Maharashtra Shaheer: शाहिरांच्या हृदयातला प्रेमळ कप्पा.. Baharla Ha Madhumas पहिलं गाणं भेटीला

महाराष्ट्र शाहीर सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे
 baharla ha madhumas, maharashtra shaheer, ajay atul, kedar shinde
baharla ha madhumas, maharashtra shaheer, ajay atul, kedar shindeSAKAL
Updated on

Baharla Ha Madhumas Song: महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर, लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shaheer) सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.

या सिनेमातील पहिलं रोमँटिक गाणं बहरला हा मधुमास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. शाहिरांच्या आयुष्यातील प्रेमळ कप्पा या गाण्यातून दिसतोय.

(baharla ha madhumas romantic song from maharashtra shaheer movie)

 baharla ha madhumas, maharashtra shaheer, ajay atul, kedar shinde
The Kashmir Files मधल्या भूमिकेसाठी पुरस्कार स्वीकारताना Chinmay Mandlekar च्या 'त्या' कृतीने सर्वांचं मन जिंकलं

बहरला हा मधुमास हे गाणं श्रेया घोषालने गायलं असून अजय अतुलने या गाण्याला संगीत दिलं आहे. या गाण्याच्या माध्यमातून केदार शिंदेची लेक सना शिंदे हिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळतेय.

याशिवाय शाहिरांच्या भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरीचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतोय. शाहिरांच्या हृदयातलं प्रेमळ पान बहरला हा मधुमास गाण्यातून दिसतोय. अल्पावधीतच या गाण्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे.

अवघ्या महाराष्ट्राला ज्यांच्या शाहीरी आणि पोवाड्यांनी वेड लावलं त्या शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहिर सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सिनेमाची निर्मिती केदार शिंदे यांची पत्नी बेला शिंदे यांनी केली आहे.

सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे सोशल मीडियाच्या विविध पोस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र शाहीर विषयी अपडेट्स शेयर करत असतात. आज महाराष्ट्र शाहीर सिनेमातलं पहिलं गाणं भेटीला आलंय. या सिनेमात अशी अनेक गाणी असणार आहेत.

 baharla ha madhumas, maharashtra shaheer, ajay atul, kedar shinde
MFK 2022: 'धर्मवीर' ठरला महाराष्ट्राचा फेवरेट सिनेमा तर Riteish Deshmukh ला मिळाला हा खास पुरस्कार

शाहीर साबळे यांच्या जीवनावर केदार शिंदे 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाची केली वर्षभर बरीच चर्चा आहे. या सिनेमाच्या संगीताची जबाबदारी अजय अतुल यांनी सांभाळली आहे.

जय जय महाराष्ट्र माझा, येळकोट येळकोट अशा शाहीर साबळे यांनी रचलेली लोकप्रिय गाणी सिनेमात पाहायला मिळणार आहेत. २८ एप्रिल २०२३ ला महाराष्ट्र शाहीर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.