राज कुंद्राला दिलासा नाहीच, 20 ऑगस्टपर्यत तुरुंगातच

raj kundra,shamita shetty
raj kundra,shamita shettyfile image
Updated on

बॉलीवूड अभिनेत्री bollywood actress शिल्पा शेट्टीचा shilpa shetty पती राज कुंद्राच्या raj kundra अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे दिसुन आले आहे. त्यानं आतापर्यत तीन वेळा न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. मात्र त्याला न्यायालयानं केराची टोपली दाखवली आहे. आज त्यानं पुन्हा सुटकेसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र आजही त्याच्या पदरी निराशा आल्यानं राजच्या मागील तपास सहजासहजी सुटणारा नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे. पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार करणे आणि ते एका अँपच्या माध्यमातून शेयर करणे याप्रकरणी त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईला देखील याप्रकरणी चौकशीसाठी बोलविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीच्या घरी मुंबई पोलिसांनी छापा टाकला होता. तिनंही आपली प्रतिमा माध्यमांनी बिघडवल्याची तक्रार न्यायालयात केली होती. मात्र त्या याचिकेवर शिल्पाला चांगलेच सुनावले. माध्यमांना जर सुत्रांनी माहिती दिली असेल तर त्यावर माध्यमांना काही म्हणता येणार नाही. आणि तसे केल्यास ते त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे असेल. असे निरिक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे.

राज कुंद्राच्या प्रकरणावर न्यायालय आता 20 ऑगस्टला सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे राजला 20 ऑगस्टपर्यत तुरुंगातच राहावं लागणार आहे. राज बरोबर त्याचा सहकारी रायन थॉर्पच्या जामीनावरील सुनावणीही न्यायालयानं फेटाळून लावली आहे. 19 जुलैला राजला मुंबई क्राईम ब्रँचनं अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर बॉलीवुडमध्ये खळबळ उडाली. त्या घटनेला शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक अशाप्रकारचा रंग मिळाला. त्यामुळे त्या घटनेला वेगळं वळण मिळाल्याचे दिसुन आले. याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास झाल्याचे दिसून आले आहे.

raj kundra,shamita shetty
गोल्डन बॉय नीरजच्या वर्कआउटचे पाहा फोटो
raj kundra,shamita shetty
'हीरामंडी' मधून उलगडणार लाहोरच्या वेश्यांची गोष्ट...

20 जुलैला राजचा मित्र रायनला अटक करण्यात आली. अजून त्यालाही जामीन मिळालेला नाही. त्याच्याकडेही यापूर्वी पोलिसांनी तासनतास चौकशी केली आहे. शिल्पानं तीनवेळा न्यायालयाकडं राजच्या सुटकेसाठी जामीनासाठी अर्ज केला आहे. मात्र न्यायालयानं त्याचा अर्ज फेटाळून लावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()