Aditi Dravid: 'नजर लावत बसण्यापेक्षा स्वतःचं कर्तृत्व वाढवा', 'बाईपण भारी देवा' फेम अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

Aditi Dravid
Aditi DravidEsakal
Updated on

Aditi Dravid: सध्या मराठी मनोरंजन विश्वात एका चित्रपटाची खुपच हवा आहे. या चित्रपटातील सहा बाईंनी अख्खं बॉक्स ऑफिस डोक्यावर उचललं आहे. सिनेमा पाहण्यासाठी मराठी प्रेक्षक आणि विशेषतः महिला वर्ग आघाडीवर आहे.

३० जुनला हा सिनेमा संपुर्ण महाराष्ट्रात रिलीज झालाय. निर्मात्यांनाही वाटलं नसेल असा भरभरुन प्रतिसाद या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिला आहे. या चित्रपटाने दहा दिवसातच २६ कोटींहून अधिकचा टप्पा पार केला आहे.

Aditi Dravid
Kangana Ranaut : 'माझ्या इंग्रजी बोलण्यावरुन उडवली होती थट्टा, आज मी...'

पहिल्याच आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने १२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. तर गेल्या आठवड्यातील रविवारी ६.६० कोटींचा आकडा पार केला. बाईपण भारी देवा चित्रपटाचं बजेट केवळ ५ कोटी असल्याचंही बोलल जात आहे.

त्यामुळे कमाईचे आकडे पाहता हा सिनेमा सुपरहिट ठरला आहे. त्यातच चित्रपटातील कलाकारही पोस्ट शेयर करत प्रेक्षकांचे आभार मानत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे हे देखील चित्रपटाबद्दल पोस्ट शेयर करत आहेत.

Aditi Dravid
Oh My God परेश रावल यांनी पुन्हा कांतीलाल साकारण्यास का दिला नकार?

मात्र या चित्रपटातील एका अभिनेत्रीची इंस्टस्टोरी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या चित्रपटातील ‘मंगळागौर’ हे गाणं लिहिणाऱ्या अभिनेत्री अदिती द्रविड हिची ही पोस्ट आहे.

या चित्रपटाचा मुळ आत्माचं हे गाणं आहे. शेवटी सगळ्या बहिणी मिळून मंगळागौर खेळतात. तेव्हाच हे गाणं आहे. हे गाणंही प्रेक्षकांना खुपच आवडलं आहे.

त्यामुळे यंदाच्या गणपतीत मंगळागौरच्या कार्यक्रमात हे गाण हमखास वाजणार हे नक्कीच. या गाण्याने यूट्यूबवर २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळले आहेत.

Aditi Dravid
Rakhi Sawant : 'राहुलजी तुम्हाला लोकसभा जिंकायचीय'? मी सांगते तसं करा! चक्क राखीनं दिला कानमंत्र

त्यामुळे तर या गाण्याबद्दल अदितीचं खूप कौतुकही होत आहे.मात्र जेव्हा तुमचं कौतुक होत तेव्हा ते सगळ्याचं लोकांना सहन होत असं नाही.

काहींना ते खटकतही. असं काहीस अदितीच्या बाततीत झाल्याचं दिसत आहे. थोड काही चांगलं झालं की लोक नजर लावतात असा टोमणा तिनं तिच्या स्टोरीतुन मारला आहे.

Aditi Dravid
Aditi Dravid

अदितीने इन्स्टाग्रामवर स्टोरीत तिचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिनं लिहिलं, '

मित्रांनो नजर लागणं हे खरं असतं. लोक इतकी नजर लावतात. दुसरे आयुष्यात यशस्वी होतात कारण त्यांनी ते मिळवण्यासाठी खुप मेहनत घेतात.

जर तुम्हालाही असं काहीतरी यश मिळवायचं असेल तर नजर लावत बसण्यापेक्षा स्वतःचेच कर्तृत्व वाढवा, प्लीज.'

Aditi Dravid
Subhedar Movie: तान्हाजी मालुसरेंच्या घरी ‘लगीनघाई! मराठमोळ्या वेशभूषेनं वेधलं लक्ष

इतकच नाही तर ती पुढे लिहिते की, 'याचबरोबर मला जे हवंय ते मिळवण्यासाठी मी प्रयत्न करण्याचा थांबवणार नाही. तुम्हाला जितका प्रयत्न करायचा तितका करा.'

आदितीने या पोस्टमध्ये कुणालही टॅग किंवा कुणाचेही नाव घेतलेले नाही. ते म्हणतात ना 'समझदार को इशारा काफी' असं काहीतरी करण्याचा प्रयत्न तिनं केलेला दिसतोय.मात्र आदितीची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.