Baipan Bhaari Deva News: बाईपण भारी देवा सिनेमाची चर्चा अजुन काही संपत नाहीय. बाईपण भारी देवा सिनेमा पहायला थिएटरमध्ये गर्दी होतेय. बाईपण भारी देवा ची तिकीटं मिळत नसल्याने अनेक प्रेक्षकांचा हिरमोड झाला.
पण ज्यांना बाईपण भारी देवा सिनेमा पहायला मिळाला नाही त्यांच्यासाठी एक खास संधी आज शुक्रवारी चालुन आलीय. बाईपण भारी देवा आज मुंबईतील या थिएटरमध्ये मोफत पहायला मिळणार आहे. जाणुन घ्या सविस्तर..
(baipan bhaari deva free show)
बाईपण भारी देवा पहा आज मोफत
बाईपण भारी देवा सिनेमा आज मुंबईतील सिटीलाईट थिएटरमध्ये मोफत बघायला मिळणार आहे. शिवसेना प्रणित आणि शिव चित्रपट सेना आयोजित' बाई पण भारी देवा ' या चित्रपटाचा खास( मोफत) शो व कलाकारांचा,
तंत्रज्ञानाचा गौरव प्रमुख मान्यवरांकडून करण्यात येणार आहे. ठिकाण. - सिटी लाईट सिनेमा माहिम. शुक्रवार संध्याकाळी वेळ ६ .३० वाजता बघायला मिळणार आहे. त्यामुळे ज्यांनी बाईपण भारी देवा पाहिला नाही त्यांच्यासाठी मोफत सिनेमा पाहण्याची ही सुवर्णसंधी आहे
बाईपण भारी देवा विशेष शोला पाहुण्यांची उपस्थिती
बाईपण भारी देवाच्या आजच्या विशेष शोला महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ निलम ताई गो-हे, खासदार राहुल शेवाळे, शिवसेना राज्य समन्वयक नरेश म्हस्के,आमदार सदा सरवणकर आमदार यामिनी ताई जाधव ,
आमदार डॉ मनीषा ताई कायंदे, शिवसेना प्रवक्त्या शीतल ताई म्हात्रे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख सौ कामिनी ताई शेवाळे ,शिवसेना उपनेत्या कला ताई शिंदे ,शिवसेना उपनेत्या तृष्णा विश्वासराव ,
विभाग प्रमुख गिरीश धानुरकर ,महिला विभाग प्रमुख सौ प्रिया ताई सरवणकर, तसेच ' बाई पण भारी देवा ' या चित्रपटातील प्रमुख कलाकार ,निर्माते ,दिग्दर्शक ,सह कलाकार , तंत्रज्ञ आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. अभिनेता आणि शिवसेना सचिव शिवचित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार या शोचा निमंत्रक आहे
बॉक्स ऑफीस सुसाट, केदार शिंदेंनी मानले आभार
बाईपण भारी देवा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट समोर आलाय. हा रिपोर्ट पाहून बाईपण भारी देवा सैराटचा विक्रम मोडणार अशी चिन्हं दिसत आहेत. बाईपण भारी देवा सिनेमाने आतापर्यंत ६५.६१ कोटींची कमाई केलीय.
या कमाईबद्दल बाईपण भारी देवाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी भावना व्यक्त केल्या. केदार शिंदे म्हणतात.. ही तर श्री स्वामींची कृपा.. हा श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद.. मराठी सिनेमाच्या इतिहासात याची नोंद घेतली जाईल. स्त्री घर चालवते तर, सिनेमा तर निश्चितच चालवू शकते. सैराट नंतरचा बाईपण ठरला महाराष्ट्राचा महासिनेमा..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.