Baipan Bhaari Deva Box Office Report News: बाईपण भारी देवा हा सिनेमा काहीच दिवसांपुर्वी रिलीज झाला. सिनेमा पाहण्यासाठी मराठी प्रेक्षक आणि विशेषतः महिला वर्ग उत्सुक होत्या. अखेर हा सिनेमा ३० जुनला संपुर्ण महाराष्ट्रात रिलीज झालाय.
बाईपण भारी देवा सिनेमाला अनपेक्षितरित्या चांगला प्रतिसाद झाला. अखेर बाईपण भारी देवा बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
(baipan bhaari deva marathi movie box office report news directed by kedar shinde)
बाईपण भारी देवा सिनेमाचं बॉक्स ऑफीस कलेक्शन समोर आलंय. या सिनेमाने विकेंडला रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केलीय.
बाईपण भारी देवा सिनेमाने बॉक्स ऑफीसवर ६.४५ कोटींची कमाई केलीय. या वर्षातली मराठी सिनेमातली आजवरची ही रेकॉर्ड ब्रेक कमाई केलीय. बाईपण भारी देवा सिनेमा प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं आहे.
या यशाबद्दल बाईपण भारी देवा चा दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात.. ही स्वामींची कृपा. हा सिध्दीविनायकाचा महाप्रसाद. मला २१ वर्ष लागली दादरचा एक रस्ता क्रॉस करायला! २००२ साली सही रे सही आलं.
त्याला तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. गेली कित्येक वर्ष त्याचे "हाऊसफुल्ल" चे बोर्ड मी पाहातो आहे. त्यानंतर अनेक नाटकं, सिनेमे यालाही भरभरून प्रतिसाद दिलात.
केदार शिंदे पुढे म्हणतात.. अगं बाई अरेच्चा, जत्रा ते महाराष्ट्र शाहीर पर्यंतच्या प्रवासात तुमची साथ लाखमोलाची ठरली.
मात्र खऱ्या अर्थाने "सही" नंतर "बाईपण भारी देवा" चं हे यश पाहातो आहे. याला फक्त तुम्हीच कारणीभूत आहात. मी काम अविरतपणे सुरू ठेवेन. तुम्ही मात्र सोबत राहा. खुप भावना व्यक्त करायच्या आहेत. पण योग्य वेळी नक्कीच करीन.
जिओ स्टुडियोजचा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला आता स्वतःसाठी देखील जगायला शिकवणार हे नक्की.. तेव्हा आता तयार रहा.. केदार शिंदेंचा स्पेशल टच असलेला, सहा गुणी अभिनेत्रींनी चित्रपटात उडवलेली धमाल, अनुभवायला!
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.